IND vs SL, Asia Cup Final twitter
Sports

IND vs SL, Asia Cup Final: बुमराह आणि सिराजने केलं लंका दहन; टीम इंडियासमोर अवघं ५१ धावांचं आव्हान

IND vs SL,Asia Cup LIVE 2023: या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा बोलबोला पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

IND vs SL,Asia Cup LIVE 2023:

भारत विरद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील अंतिम सामना सुरू आहे. कोलंबोच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर भारतीय संघ गोलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. दरम्यान भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने भारतीय संघाकडून दमदार कामगिरी केली आहे.

या दमदार गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेचा डाव अवघ्या ५० धावांवर संपुष्टात आला आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला ५१ धावांची गरज आहे. (Latest Marathi News)

श्रीलंकेने दिलं ५१ धावांचं आव्हान..

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेला श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर ऑल आउट झाला. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावांची खेळी केली. तर दूशन हेमंताने नाबाद १३ धावा केल्या.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने अवघ्या २१ धावा खर्च करत सर्वाधिक ६ गडी बाद केले. तर हार्दिक पंड्याने ३ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तसेच संघातील अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने १ गडी बाद केला.

भारताचा एकतर्फी विजय..

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ५१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून ईशान किशन आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर आली होती.

डावाची सुरुवात करताना दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या डावात ईशान किशनने नाबाद २३ तर शुबमन गिलने नाबाद २७ धावांची खेळी केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन मच्छीमारांकडून विधवा महिलेवर आळीपाळीनं बलात्कार; घरी नेत पुन्हा अब्रूचे लचके तोडले

Maharashtra Live News Update: नंदुरबार दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला 'तीन'ची सुट्टी

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

Life expectancy with a single kidney: व्यक्ती एका किडनीवर किती जगता येतं? जाणून घ्या काय काळजी घ्यावी लागते?

SCROLL FOR NEXT