Harbhajan Singh on Team India squad : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीवर हरभजन सिंग नाराज SAAM TV
Sports

Ind vs SL : टीम इंडियाची निवड हरभजन सिंगच्या पचनी पडलीच नाही, ३ खेळाडूंची नावं घेत विचारला थेट सवाल!

Team India Squad For Sri Lanka Tour : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीवर हरभजन सिंग यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Nandkumar Joshi

श्रीलंकेविरुद्द होणाऱ्या टी २० आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. मात्र, टीम इंडियाच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि युजवेंद्र चहल यांसारख्या खेळाडूंना स्थान न दिल्यानं त्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

भारतीय संघ जुलैच्या अखेरीला श्रीलंकेविरुद्ध टी २० आणि वनडे मालिका खेळणार आहे. २७ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिल्यांदाच संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

अजित आगरकरच्या अध्यक्षतेखाली निवड समितीनं झिम्बाब्वेविरुद्धच्या टी २० सामन्यांत शतक ठोकणाऱ्या अभिषेक शर्मा आणि तडाखेबंद खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला (एकदिवसीय मालिका) संघात स्थान दिलेलं नाही. निवड समितीच्या या निर्णयानं हरभजन सिंगला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

संजू सॅमसननं आपल्या अखेरच्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलं होतं. हरभजन सिंगनं युजवेंद्र चहलचाही यावेळी उल्लेख केला. त्याला तर टी २० आणि वनडे यापैकी कोणत्याच फॉरमॅटमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. चहल टी २० वर्ल्डकपमध्ये संघात होता. पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर हरभजन सिंगनं ट्विट करून तीव्र नाराजी व्यक्त केली. युजवेंद्र चहल, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या तिघांना श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान का देण्यात आलं नाही, याचं आश्चर्य वाटतं. यामुळं मी स्वतः हैराण झालो आहे, असं हरभजननं म्हटलं आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्यानंतर निवड समितीनं सूर्यकुमार यादवकडे टी २० संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. तर शुभमन गिल याला दोन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधार म्हणून नेमले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT