India Vs Sri Lanka 3rd ODI/BCCI Saam Tv
Sports

Ind Vs SL 3rd ODI : टीम इंडियाची प्लेइंग ११ कशी असेल? सूर्यकुमार, इशानला संधी मिळेल का?

Ind Vs SL 3rd ODI, Team India Playing XI Prediction Update : अखेरच्या वनडेसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

Nandkumar Joshi

Ind Vs SL 3rd ODI Playing XI Prediction : श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना तिरुवअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियममध्ये होणार आहे. या मालिकेत टीम इंडियानं सलग दोन सामने जिंकून मालिकाही खिशात घातली आहे.

टीम इंडिया (Team India) चा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अखेरच्या वनडेमध्ये श्रीलंकेला पराभूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल यात शंकाच नाही. अशावेळी अखेरच्या वनडेसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, तशी शक्यता कमी आहे. सध्याच्या खेळाडूंचा फॉर्म बघता अखेरच्या सामन्यात संघात काही बदल होतील अशी सध्या तरी कोणतीही शक्यता दिसून येत नाही.

दुसऱ्या वनडे सामन्यात संघात एक बदल करण्यात आला होता. प्लेइंग इलेव्हनमध्ये दुखापतग्रस्त युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी देण्यात आली होती. कुलदीपने मिळालेल्या संधीचे सोने केले आणि या सामन्यात तीन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

सूर्यकुमार-इशानला खेळवणार?

जबरदस्त फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशनला (Ishan Kishan) श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांत संधी मिळाली नाही. सूर्यकुमार हा टी २० फॉरमॅटमधील अव्वल फलंदाज आहे. तर इशान किशनने बांगलादेश दौऱ्यावर अखेरच्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावलं होतं. दोघेही चांगलेच फॉर्मात असले तरी अद्याप या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही.

सूर्यकुमार आणि इशानला प्लेइंग इलेव्हनसाठी वाट पाहावी लागेल. तसे संकेत फलंदाजी प्रशिक्षकानं दिले आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये ज्यांना संधी मिळाली आहे, त्यांची कामगिरी चांगली होत आहे, असे प्रशिक्षकाचे म्हणणे आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडेत सूर्यकुमार आणि इशानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT