team india google
Sports

IND vs SA: पराभवाची मालिका थांबणार का? ३१ वर्षांची प्रतिक्षा संपवण्यासाठी टीम इंडिया मैदानात;पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

India vs South Africa 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सेंच्युरियनच्या मैदानावर प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

India vs South 1st Test, Head To Head Record:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सेंच्युरियनच्या मैदानावर प्रारंभ होणार आहे. दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत जाऊन हरवणं हे भारतीय संघासमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

कारण भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला आजवर दक्षिण आफ्रिकेत जाऊन पराभूत करु शकलेला नाही. दरम्यान ही मालिका सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या कसा राहिलाय भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा हेड टू हेड रेकॉर्ड.

भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. वनडे,टी-२० नंतर आता दोन्ही संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरु होईल. हा सामना तुम्ही टी.व्हीसह मोबाईलवरही फ्रीमध्ये पाहू शकता.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

भारतीय संघाने जगातील एकूण एक संघाला त्यांच्याच देशात जाऊन हरवलं आहे. मात्र भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत पराभूत करु शकलेला नाही. १९९२ मध्ये दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना डरबनच्या मैदानावर खेळला गेला होता. हा सामना होऊन ३१ वर्ष उलटली आहेत.

मात्र अजुनही भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत हरवू शकलेला नाही. दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर दोन्ही संघ ४२ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान १७ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.

तर १५ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर १० सामने ड्रॉ झाले आहेत. ही आकडेवारी जर पाहिली तर तुम्हाला दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत आहे, असं दिसलं असेल. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ मायदेशात खेळतो त्यावेळी त्यांची ताकद द्विगुणीत होते. (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळताना दोन्ही संघ २३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान केवळ ४ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. तर १२ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान ७ कसोटी सामने ड्रॉ राहिले आहेत. २०२१ मध्ये जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता त्यावेळी पहिल्याच कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT