IND vs SA World Cup 2022  Saam Tv
क्रीडा

IND vs SA : भारत विरुद्ध आफ्रिका, कोण कुणावर भारी? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

पर्थची विकेट वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथील अतिरिक्त उसळत्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आपला वेग दाखवतील.

Satish Daud

IND vs SA World Cup 2022 : टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली. सलामीच्या सामन्यांत पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर, दुसऱ्या सामन्यांतही भारताने नेदरलॅंडसला पराभूत केलं. आता भारतीय संघाची (Team India)  भिडंत बलाढ्य दक्षिण आक्रिकेशी होणार आहे. हा सामना रविवारी (30 ऑक्टोबर) पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जाईल.

पर्थची विकेट वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथील अतिरिक्त उसळत्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आपला वेग दाखवतील. टीम इंडियाने टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) एक आठवडा आधी येथे सराव शिबिर सुरू केले होते. भारताने पर्थमध्येच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सराव सामने खेळले जेणेकरून त्याचे फलंदाज आणि गोलंदाज उसळत्या आणि वेगवान खेळपट्ट्यांशी जुळवून घेऊ शकतील.

भारत विरुद्ध आफ्रिका, कोण कुणावर भारी?

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांनी आपापसात एकूण 23 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान भारताने 13 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आक्रिकेने 9 सामन्यांत विजय मिळवला आहे. यातील एक सामना बरोबरीत सुटला आहे. 2006 मध्ये प्रथमच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

पर्थमध्ये टीम इंडियाचा दबदबा

पर्थमध्ये आतापर्यंत भारताने 5 टी 20 सामने खेळले आहेत. यातील सर्वच्या सर्व सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. आकडेवारी पाहता पर्थमध्ये भारतीय संघाचा चांगलाच दबादबा राहिलेला आहे. मात्र तरी सुद्धा भारताला आक्रिकेबाबत सतर्क राहावं लागेल. कारण दक्षिण आफ्रिकेच्या संघात असे भयंकर वेगवान गोलंदाज आहेत जे आपल्या वेगाने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.

पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल

नुकसाच पर्थमध्ये, पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघात सामना झाला. कमी धावसंख्येच्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानवर एका धावेने रोमहर्षक विजय नोंदवला. या सामन्यात एकूण 16 विकेट पडल्या होत्या. यापैकी 9 विकेट वेगवान गोलंदाजांच्या वाट्याला गेल्या. बाबर आझम अँड कंपनीने चार वेगवान गोलंदाजांसह या सामन्यात प्रवेश केला. त्याच्या बाजूने युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीमने 4 बळी घेतले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT