T20 World Cup 2022 : पाकिस्तान अजूनही पोहचू शकतो सेमीफायनलमध्ये? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

पाकिस्तानचा संघ अजूनही सेमीफायनलची फेरी गाठू शकतो. त्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागेल.
Pakistan Chances To Qualify :
Pakistan Chances To Qualify :PCB Twiiter
Published On

Pakistan Chances To Qualify : पाकिस्तान संघासाठी टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरूवात अत्यंत खराब झाली. पहिल्या सामन्यांत भारताकडून झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात दुबळ्या मानल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने सुद्धा पाकिस्तानला (Pakistan) पराभूत केलं. या पराभवासह पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग देखील कठीण झाला आहे. मात्र, असं असलं तरी पाकिस्तानचा संघ अजूनही सेमीफायनलची फेरी गाठू शकतो. त्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागेल. (Cricket News)

Pakistan Chances To Qualify :
PAK vs ZIM : पराभवानंतर पाकिस्तानचा उपकर्णधार ढसाढसा रडला; VIDEO व्हायरल

फक्त सामने जिंकून पाकिस्तानचे भागणार नाही तर त्यांना भारतीय संघाच्या विजयावर सुद्धा अवलंबून राहावे लागणार आहे. जर पाकिस्तानला सेमीफायनल खेळायची असेल तर त्यांना भारतीय संघाच्या विजयाची सुद्धा प्रार्थना करावी लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पूर्ण भवितव्य आता भारतीय संघाच्या हातात असणार आहे.

भारतीय संघ (Team India) सध्या २ सामन्यांत २ विजयासाठी गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. जर भारताने साखळी फेरीतील उर्वरित सर्वच्या सर्व सामने जिंकले तर भारताचे एकूण १० गुण होतील आणि गृप ब मधून सेमीफायनलमध्ये पोहचणारा भारतीय संघ पहिला संघ ठरेल. भारतीय संघाला येत्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा सामना करावा लागणार आहे.

Pakistan Chances To Qualify :
T20 World Cup 2022 : पाकिस्तान हरला, पण सगळा राग टीम इंडियावर काढला; शोएब अख्तरनं केली विखारी टीका

भारताने सर्व सामने जिंकूनही पाकिस्तानी संघ उपांत्य फेरी गाठू शकणार नाही. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताकडून पराभूत झाल्यानंतर आणखी दोन सामने कोणत्याही संघाकडून हरतो का, यावरही पाकिस्तानी संघ अवलंबून आहे. ज्यामध्ये फक्त पाकिस्तानला एका सामन्यात आफ्रिकन संघावर मात करावी लागणार आहे.

बलाढ्य आफ्रिकेला नमवणं इतर संघांसाठी खूपच कठीण असणार आहे. म्हणजेच काय तर पाकिस्तानला आता उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ ज्या फॉर्ममध्ये आहे, तिथून तीन सामने हरणे शक्य नाही. क्रिकेटच्या खेळात काहीही घडू शकते असं म्हटलं जातं. जर पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वेविरुद्धचा सामना हरू शकतो तेव्हा दक्षिण आफ्रिकेला का नाही, अशी प्रार्थना पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com