IND vs SA twitter
Sports

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

India vs South Africa Playing XI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकला आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 4th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकला आहे. मालिकेतील चौथा सामना जोहान्सबर्गमध्ये सुरु आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६१ धावांनी शानदार विजय मिळवला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार कमबॅक करत भारताच्या हातून विजय हिसकावून घेतला.

यासह मालिकेत १-१ ची बरोबरी साधली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आणि मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. भारतीय संघाने मालिका जिंकण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.

पण मालिका जिंकायची असेल, तर हा सामना जिंकावाच लागणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकून मालिका १-१ ने बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दक्षिण आफ्रिका (Playing XI): रायन रिकल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जान्सन, जेराल्ड कोएट्झी, अँडिले सिमलाने, केशव महाराज, लुथो सिपामला

भारत (Playing XI): संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रामनदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT