team india twitter
Sports

IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला डच्चू मिळणार? निर्णायक सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग XI

Team India Playing XI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या चौथ्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

India vs South Africa 4th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी -२० मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारतीय संघ ही मालिका ३-१ ने आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

गेल्या दोन्ही सामन्यात संजू सॅमसन आणि रिंकू सिंगला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात दोघांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी अशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

संजूचा पत्ता कट होणार?

संजू सॅमसनने या मालिकेतील पहिल्या सामन्यात तुफानी शतकी खेळी केली होती. मात्र पुढील दोन्ही सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याची मागणी केली जात आहे.

मात्र सूर्यकुमार यादव असं करणार नाही. कारण त्याने आधीच संजू सॅमसनला सर्व सामने खेळवणार असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे संजू खेळणार हे जवळजवळ निश्चित आहे. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११ बदलणार?

दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीच्या जागी नकबायोमजी पीटरचास समावेश केला जाऊ शकतो. दक्षिण आफ्रिका कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकून मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

भारतीय संघाची प्लेइंग ११: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.

साउथ अफ्रीका की संभावित प्लइंग इलेवन: रयान रिकेल्टन, रिजा हेंड्रिक्स, एडेन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जानसेन, एंडिले सिमलेन, गेराल्ड कोएत्जी/नकबायोमजी पीटर, केशव महाराज, लुथो सिपाम्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT