Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने केला मोठा विक्रम, T20मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज

India vs South Afrika T-20: डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार यादवने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे.
Suryakumar Yadav New Record
Suryakumar YadavYandex
Published On

भारताचा T20 कर्णधार सूर्यकुमार यादवने शुक्रवारी आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार यादवने १७ चेंडूत २१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने १२३.५३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत १ षटकार आणि २ चौकार लगावले. सूर्यकुमार यादवने या काळात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा चमत्कार केला. सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनचा महान विक्रम मोडला.

भारताचा T20 कर्णधार सूर्यकुमार यादवने शुक्रवारी आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्यकुमार यादवने १७ चेंडूत २१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने १२३.५३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत १ षटकार आणि २ चौकार लगावले. सूर्यकुमार यादवने या काळात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा चमत्कार केला. सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरनचा महान विक्रम मोडला.

Suryakumar Yadav New Record
IND vs SA : सॅमसनने धोनीचा विक्रम मोडला, 7000 धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय खेळाडू

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०५ षटकार मारण्याचा विश्वविक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्माशिवाय T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० किंवा त्याहून अधिक षटकार ठोकणारा एकही फलंदाज जगात नाही. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मानंतर मार्टिन गप्टिलने १७३ षटकार ठोकले आहेत.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-५ फलंदाज

1. रोहित शर्मा (भारत) – २०५ षटकार

2. मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) – १७३ षटकार

3. सूर्यकुमार यादव (भारत) - १४५ षटकार

4. निकोलस पूरन (वेस्ट इंडिज) – १४४ षटकार

5. जोस बटलर (इंग्लंड) – १३७ षटकार

शुक्रवारी झालेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव केला. सलामीवीर संजू सॅमसनच्या सलग दुसऱ्या शतकानंतर वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्या फिरकी जादूच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

Suryakumar Yadav New Record
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा रॉकेट थ्रो, फलंदाज पुन्हा धावायची हिंमतच करणार नाही, Video पाहिलात का?

भारताच्या २०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चक्रवर्ती (२५ धावांत तीन विकेट) आणि बिश्नोई २८ धावांत तीन विकेट) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ १७.५ षटकांत १४१ धावांत सर्वबाद झाला. वेगवान गोलंदाज आवेश खाननेही २८ धावांत दोन बळी घेतले. आंतरराष्ट्रीय T20 मधील भारताचा हा सलग ११ वा विजय आहे. दक्षिण आफ्रिकेकडून केवळ हेनरिक क्लासेन (२५), जेराल्ड कोएत्झी (२३) आणि सलामीवीर रायन रिक्लेटन (२१) यांना २० धावांचा टप्पा ओलांडता आला.

Written By: Dhanshri Shintre.

Suryakumar Yadav New Record
ICC Cricket: पाकिस्तानच्या नकोशा विक्रमाची पुनरावृत्ती, 'या' ६ फलंदाजाला खातेही उघडता आले नाही, कोणत्या संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com