भारताने डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या 107 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 202 धावा केल्या.प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा 17.5 षटकांत सर्वबाद १४१ धावांवर गेम आटोपला.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 षटकात 8 विकेट गमावून 202 धावा केल्या. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. संजू सॅमसनने ८व्या षटकात लेगस्पिनर पीटरविरुद्ध सलग २ षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. काबायोमजी पीटरच्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने मिड-विकेटच्या दिशेने षटकार ठोकला. सॅमसनने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक केले. त्याने 107 धावांची खेळी खेळली.
सूर्यकुमार बाद झाल्यानंतर तिलक वर्मा फलंदाजीला आला. अँडिले सिमेलेनच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर त्याने शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो जुळू शकला नाही. दुसरा चेंडू तिलकच्या हेल्मेटला लागला. इथे तिलकने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिलकनेही ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर अर्शदीप सिंगला बाद केले. येथे यान्सनने यॉर्कर लेन्थ बॉल टाकला. अर्शदीप पॅव्हेलियनमध्ये परतत होता, मात्र काही वेळाने तिसऱ्या पंचाने चेंडू नो बॉल घोषित केला आणि फलंदाजाला जीवदान मिळाले. अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता.
Written By: Dhanshri Shintre.