team india twitter/bcci
Sports

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

India vs South Africa 4th T20I Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

IND vs SA 4TH T20I: चौकार षटकार आणि केवळ चौकार षटकार.. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या चौथ्या टी २० सामन्यात चेंडू मैदानात कमी आणि मैदानाबाहेर जास्त गेले. चेंडू टाकावा तर टाकावा कुठं? असा प्रश्न दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पडला होता.

गोलंदाजांची धुलाई करत भारताने २० षटक अखेर २८३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा बचाव करताना भारताच्या गोलंदाजीतही आक्रमकता पाहायला मिळाली. यासह भारताने हा सामना १३५ धावांनी आपल्या नावावर केला. यासह टी - २० मालिका ३- १ ने आपल्या नावावर केली.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २८४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. सलामीला आलेल्या हेंड्रिक्सला अर्शदीप सिंगने शून्यावर क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं. त्यानंतर हार्दिक पंड्याने रिकलटनला १ धावेवर बाद केलं.

कर्णधार एडेन मार्करम ८ तर क्लासेन शून्यावर माघारी परतला. अर्शदीपने सुरुवातीलाच ३ गडी बाद केले. भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्या,रवी बिश्नोई आणि रमनदीप सिंगने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. तर अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी २- २ गडी बाद केले.

भारतीय संघाने केल्या २८३ धावा

या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी वादळी खेळी केली.

भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी मैदानात आली. दोघांनी नेहमीप्रमाणेच सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. अभिषेक शर्माने ताबडतोड सुरुवात करून देत १८ चेंडूत ३६ धावांची खेळी केली.

दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांचं वादळ पाहायला मिळालं. भारतीय फलंदाजांनी या डावात २३ षटकार आणि १७ चौकार खेचत २० षटक अखेर १ गडी बाद २८३ धावा केल्या.

संजू सॅमसनने ५६ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांचा मदतीने १०९ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ४७ चेंडूत ९ चौकार आणि १० षटकांरांच्या मदतीने नाबाद १२० धावांची खेळी केली. दोघांनी मिळून २१० धावांची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT