नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये टी -२० आणि वनडे मालिका पार पडली. टी -२० मालिका १-१ च्या बरोबरीत सुटली. तर वनडे मालिकेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २-१ ने विजय मिळवला आहे.
पार्लच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७८ धावांनी विजय मिळवला. यासह विराटनंतर दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकणारा केएल राहुल हा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे.
२०२३ मध्ये सर्वाधिक सामने..
या सामन्यासह भारतीय संघाचे २०२३ मधील सर्व वनडे सामने समाप्त झाले आहेत. यासह भारतीय संघाच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारताने यावर्षी २७ वनडे सामने जिंकले आहेत.
यासह भारतीय संघ एकाच वर्षात सर्वाधिक वनडे सामने जिंकणारा दुसराच संघ ठरला आहे. यावर्षी भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सर्व सामने जिंकले. मात्र अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना वगळला तर मायदेशात आणि परदेशात खेळताना भारताचा रेकॉर्ड जबरदस्त राहिला आहे.
२०२३ मध्ये भारताचा दमदार खेळ..
भारतीय संघाने २०२३ मध्ये दमदार खेळ केला आहे. २०२३ मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताने जेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर वर्ल्डकप स्पर्धेतील सर्व १० सामने जिंकले, मात्र अंतिम सामना गमावला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या पराभवामुळे भारतचं वर्ल्ड चॅम्पियन बनायचं स्वप्न हुकलं. एकाच वर्षात सर्वाधिक वनडे सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने २००३ मध्ये एकाच वर्षी ३० सामने जिंकले होते. (Latest sports updates)
एकाच वर्षात सर्वाधिक वनडे सामने जिंकणारे संघ :
ऑस्ट्रेलिया - ३० वनडे सामना (२००३)
भारतीय संघ - २८ वनडे सामने (२०२३)*
ऑस्ट्रेलिया - २६ वनडे सामने ( १९९९)
दक्षिण आफ्रिका -२५ वनडे सामने ( १९९६)
दक्षिण आफ्रिका -२५ वनडे (२०००)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.