ind vs sa 2nd odi weather update google
क्रीडा

IND vs SA 2nd ODI Weather Update: भारत- द.आफ्रिका दुसरा वनडे होणार रद्द? समोर आली मोठी अपडेट

India vs South Africa Weather Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 2nd ODI, Weather Report:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज रंगणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो सामना असणार आहे.

कारण मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड देत ८ गडी राखून विजय मिळवला होता. मालिकेत १-० ने आघाडीवर असलेला भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यावेळी कसं असेल हवामान?जाणून घ्या.

अॅक्यूवेदरच्या अहवालानुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाजी बातमी समोर येत आहे. या सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ५०-५० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. दिवसाचं तापमान २४ डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल.

या मैदानावर कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड?

हा सामना सेंट जॉर्ज क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड चिंताजनक राहिला आहे. या मैदानावर भारतीय संघाने ६ सामने खेळले आहेत. या ६ पैकी भारताला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.

तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. २७४ धावा ही भारतीय संघाची या मैदानावरील सर्वोत्तम धावसंख्या आहे. १४७ धावा ही भारतीय संघाची या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या आहे. (Latest sports updates)

पिच रिपोर्ट..

या मैदानावर फिरकी गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. सुरुवातीला खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. तर सामना जसजसा पुढे जाईल,तशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी पोषक ठरते.

गेल्या ५ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या मैदानावर आतापर्यंत ४२ सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २० सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने २१ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT