dean elgar with marco jansen twitter
Sports

IND vs SA: एल्गर- यान्सेन चमकले! शतक - द्विशतक हुकलं; पण टीम इंडियावर घेतली मोठी आघाडी

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याचा थरार सुरू आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa, 3rd Day:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याचा थरार सुरू आहे. सेंच्यरियनच्या सुपर स्पोर्ट्सपार्कच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या २४५ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेची १६३ धावांची आघाडी..

सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४५ धावा केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव ४०८ धावांवर संपुष्टात आला. यासह दक्षिण आफ्रिकेने १६३ धावांची आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना डीन एल्गरने सर्वाधिक १८५ धावांची खेळी केली. तर मार्को यांसेनने ८४ धावांची नाबाद खेळी केली. तर डेव्हिड बेडिंगहॅमने ५६ धावा केल्या.

डीन एल्गर आणि यांसेनचं शतक हुकलं...

एकीकडे विकेट्स जात होते त्यावेळी डीन एल्गर एक बाजू धरून उभा होता. त्याला मार्को यांसेनची चांगली साथ मिळाली. दोघांनी मिळून १११ धावा जोडल्या. या भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ४०० धावांची मजल मारली. डीन एल्गर १८५ धावा करत माघारी परतला. तर मार्को यांसेन ८४ धावांवर नाबाद परतला. (Latest sports updates)

भारतीय संघाने केल्या २४५ धावा

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमाने नाणेफेक जिंकली आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. केएल राहुल वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली ३८ तर शार्दुल ठाकूर २४ धावा करत माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT