rohit sharma twitter
क्रीडा

Ind vs Pak Toss Update: हाय व्हॉल्टेज सामन्यात टीम इंडियाने जिंकला टॉस! पाकिस्तानला बॅटिंगचं आमंत्रण; गिलचं संघात कमबॅक

Ankush Dhavre

India vs Pakistan, Toss And Playing 11 Update:

ज्या क्षणाची सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या हाय व्हॉल्टेज सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तानचा संघ फलंदाजी करताना दिसून येणार आहे.

शुभमन गिलचं संघात कमबॅक..

या सामन्यासाठी शुभमन गिलला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. ही भारतीय संघासाठी समाधानकारक बाब आहे. गेल्या २ सामन्यांमध्ये तो खेळू शकला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती.

त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसून आला नव्हता. त्याच्याऐवजी ईशान किशनला संधी दिली गेली होती. पाकिस्ताविरूद्धच्या सामन्यात ईशान किशनला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं आहे. तर त्याच्याऐवजी गिल खेळताना दिसून येणार आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तान संघ:

अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रउफ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

SCROLL FOR NEXT