IND vs PAK T20 World Cup saam tv
Sports

IND vs PAK: पाकिस्तानविरूद्ध हे ११ धुरंधर उतरणार मैदानात; 'या' खेळाडूचा पत्ता कट होण्याची शक्यता

IND vs PAK T20 World Cup: भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११, कोलंबो पीच रिपोर्ट आणि स्पिनर-वेगवान गोलंदाजांची रणनीती कशी असेल ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

श्रीलंकेतील कोलंबोमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. हा सामना टीम इंडियाला कोणत्याही बाबतीत जिंकायचाच आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये कोणा कोणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.

आर. प्रेमदासा स्टेडियमचं पीच हे स्पिनर्ससाठी अनुकूल आहे. त्यामुळे टीम इंडिया प्लेइंग ११ मध्ये एका अतिरिक्त स्पिनरचा समावेश करू शकते. अशावेळी अर्शदीप सिंगला टीममधून वगळलं जाऊ शकतं. अभिषेक शर्मा खेळणार की नाही या मुद्द्यावर सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.

टी-२० वर्ल्डकपच्या १० व्या सिझनमध्ये दोन्ही टीम विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आज, भारत आणि पाकिस्तान विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. हवामानाची परिस्थिती पाहता वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये स्विंग मिळणार आहे. ज्यामुळे फलंदाजांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर यापैकी एका स्पिनरला टीममध्ये जागा मिळू शकते.

आजच्या सामन्यात वेगवान म्हणून जसप्रीत बुमराह या एकाच गोलंदाजाचा समावेश होऊ शकतो. तर हार्दिक पंड्या पॉवरप्लेमध्ये तीन ओव्हर्स टाकू शकतो. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पंड्याने पहिली ओव्हर टाकली होती. हार्दिक गेल्या काही काळापासून चांगली गोलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे शिवम दुबे हा देखील एक पर्याय आहे.

कुलदीप की वॉशिंग्टन कोणाला मिळणार संधी?

वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून बरा झाला असून आजच्या सामन्यात त्याचा समावेश केला जाऊ शकतो. मात्र त्याच्या त्याला बाहेर बसून अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासोबत तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं.

अभिषेक शर्मा आज खेळणार का?

पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने सांगितलं की, 'जर तुम्हाला हवं तर १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा नक्कीच खेळेल." यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा म्हणाला होता, "अभिषेकने खेळावं अशी आमची इच्छा आहे. कारण आम्हाला भारताच्या बेस्ट टीमसोबत सामना करायचा आहे.

कशी असेल भारताची प्लेइंग ११

ईशान किशन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT