Ind vs Pak Saam tv
क्रीडा

Ind vs Pak: आधी धो-धो पाऊस, नंतर कोहली-राहुलचा वादळी तडाखा; पाकिस्तानला टीम इंडियाचं 357 धावांचं आव्हान

India vs Pakistan Reserve Day Match : पाऊस थांबला, भारत-पाक सामन्याला पुन्हा सुरुवात...

Vishal Gangurde

India vs Pakistan Reserve Day Match :

कोलंबोच्या प्रेमदासा मैदानात धो-धो पाऊस बरसल्यानंतर विराट कोहली-राहुलचा वादळी खेळ सुरू झाला. दोघांनीही पाकिस्तानच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. राहुल आणि विराटनं शतकी खेळी करत पाकिस्तानसमोर धावांचा डोंगर उभारला. या दोघांच्या बहारदार खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला 357 धावांचं आव्हान दिलं. (Latest Marathi News)

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. कालच्या डावात रोहित शर्मा ५६ धावांवर बाद झाला. तर शुबमन गिल ५८ धावांवर बाद झाला. तर आज सुरु झालेल्या राखीव दिवशी फलंदाजी करताना विराट कोहली आणि केएल राहुलने चौकार-षटकारांची आतिषबाजी केली .

भारताने २५ व्या षटकात १५० धावा पूर्ण केल्या. केएल राहुलने ६० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकात ५ चौकार आणि एक षटकाराचा सामावेश आहे. केएल राहुलनंतर विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं. कोहलीने ५५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. कोहलीने अर्धशतक करताना चार चौकार लगावले.

विराट कोहली आणि केएल राहुले ४३ व्या षटकात दोघांनी १५० धावांची भागीदारी रचली. या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली तुफान फॉर्मात दिसले. या डावात केएल राहुल आणि विराट कोहली या दोघांनी दिमाखदार शतक ठोकले.

या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहलीच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने साडे तीनशे पार धावा ठोकल्या. टीम इंडियाने ५० षटकात २ गडी गमावून ३५६ धावा कुटल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT