IND vs PAK Women's WC:भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना पार पडणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर समोर मजबूत प्लेइंग ११ निवडण्याचं आव्हान असणार आहे.
कारण भारतीय संघाची उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना दुखापतीमुळे हा सामना खेळू शकणार नाहीये. ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या सराव सामन्यात ती दुखापतग्रस्त झाली होती. त्यामुळे आज भारतीय संघ स्मृती मंधाना शिवाय मैदानात उतरणार आहे.
पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाच्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे. त्यांनी म्हटले की, "हरमन खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे."
तसेच ते पुढे म्हणाले की,"तिने गेल्या २ दिवसांपासून नेट्समध्ये कसून सराव केला आहे. तर स्मृतीच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे ती खेळु शकणार नाहीये. तिच्या बोटाला फ्रॅक्चर झाला नसून ती दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसून येऊ शकते."
स्मृती मंधानाच्या अनुपस्थितीत पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या ओपनिंग जोडीत बदल होऊ शकतात. शेफाली वर्मासह यस्तीका भाटिया किंवा जेमीमा रॉड्रिग्ज ओपनिंग करण्यासाठी मैदानात येऊ शकते.
पाकिस्तान विरुध्द होणाऱ्या सामन्यात अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११
भारतीय संघ : शेफाली वर्मा, जेमीमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर,ऋचा घोष (विकेटकिपर), देविका वैद्य/ शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, स्नेह राणा, रेणुका सिंग.
पाकिस्तान संघ : मुनीबा अली, जावेरिया खान, बिस्मान मारुफ (कर्णधार), निदा डार, आयशा नसीम, आलिया रियाज, ओमिमा सोहेल, फातिमा सना, एमन अनवर,तुबा हसन, सादिया इक्बाल
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.