Updated Time Table Of World Cup 2023 Saam Tv
Sports

World Cup 2023 Timetable: वर्ल्डकपबाबत मोठी अपडेट आली समोर! लवकरच होणार सुधारीत वेळापकत्रकाची घोषणा

World Cup 2023: लवकरच या स्पर्धेचे सुधारीत वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार आहे.

Ankush Dhavre

Updated Time Table Of ODI World Cup 2023:

आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेसाठी २७ जुलै रोजी वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती.

तर स्पर्धेतील बहूप्रतिक्षीत भारत - पाकिस्तान सामन्याचे आयोजन १५ ऑक्टोबर रोजी केले जाणार होते. मात्र या सामन्याच्या तारखेत बदल केला जाणार आहे.

हा सामना आता १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाऊ शकतो. तसेच लवकरच या स्पर्धेचे सुधारीत वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार आहे.

सुधारीत वेळापत्रकानुसार पाकिस्तान संघाच्या ३ सामन्यांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. तसेच पाकिस्तानचा श्रीलंकेविरूद्ध होणारा सामना १० ऑक्टोबरला होऊ शकतो. या सामन्यांसह पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या तारखेतही बदल होऊ शकतो.

कारण या सामन्याच्या दिवशी काली पुजेच्या दिवशी असणार आहे. त्यामुळे हा सामना पुजेच्या आदल्या दिवशी खेळवला जाऊ शकतो.

या कारणामुळे बदलणार स्पर्धेचे वेळापत्रक..

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. मात्र या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे. त्यामुळे या सामन्याचे आयोजन १४ ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे.

तर पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड यांच्यात होणारा सामना हा १२ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. मात्र या दिवशी कोलकात्यात काली पुजेची धुमधाम असेल. त्यामुळे या सामन्याचे आयोजन एक दिवसाआधी केले जाऊ शकते. भारत आणि पाकिस्तान या एका सामन्याचे वेळापत्रक बदलल्यामुळे संपूर्ण वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. (Latest sports updates)

तिकीट विक्रीला केव्हा होणार सुरूवात?

वर्ल्डकपच्या तिकीट विक्रीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुधारीत वेळापत्रकाची घोषणा होताच वर्ल्डकपच्या तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपमध्ये ई - तिकीट असणार नसल्याची घोषणा जय शाह यांनी केली आहे. तुम्हाला तिकीट स्टेडियममध्ये जाऊन घ्यावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT