India vs Pakistan set for historic Asia Cup 2025 final clash in Dubai. saam tv
Sports

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Asia Cup 2025 Final India vs Pakistan: आशिया कप २०२५ चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. ४१ वर्षानंतर दोन्ही देशाचे संघ आमनेसामने आलेत.

Bharat Jadhav

  • आशिया कप 2025 चा फायनल भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार.

  • 28 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा ऐतिहासिक सामना होईल.

  • भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आशिया कपच्या फायनलमध्ये आमनेसामने येतील.

आशिया कपचा अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येतील. ग्रुप स्टेज आणि सुपर ४ नंतर आता हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमनेसामने आलेत. या परिस्थितीमुळे आशिया कपचा इतिहास बदलणार आहे. या स्पर्धेत यापूर्वी कधीही न पाहिलेलं एक दृश्य पाहायला मिळेल.

आशिया कपचा इतिहास बदलला

सुपर ४ मध्ये दमदार कामगिरी करून भारताने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता पाकिस्ताननेही बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केलाय. आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचलाय.

ही स्पर्धा १९८४ मध्ये सुरू झाली होती, परंतु दोन्ही संघ कधीही अंतिम फेरीत आमनेसामने आलेले नाहीत. पण यावेळी मात्र हे होणार आहे. आशिया कपचा हा १७ वा हंगाम आहे. मागील १६ हंगामात असा अंतिम सामना कधीही पाहिला नव्हता. दोन्ही संघांमधील हा ऐतिहासिक सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

कोण मारेल बाजी?

दरम्यान टीम इंडिया नववे विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८ आणि २०२३ मध्ये विजेतेपद जिंकले आहे. तर पाकिस्तानने दोनदा विजेतेपद जिंकलंय. २००० आणि २०१२ मध्ये पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली होती.

२०२५ आशिया कपचा आतापर्यंतचा प्रवास

या स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. भारताने ग्रुप स्टेजमध्ये यूएई, पाकिस्तान आणि ओमानचा पराभव करून सुपर फोरमध्ये प्रवेश केला. तर पाकिस्तानला गट फेरीत भारताकडून पराभव पत्करावा लागला. पण युएई आणि ओमानला हरवून पाकिस्तान सुपर-४ मध्ये पोहोचला. त्यानंतर टीम इंडियाने सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्ताननेही श्रीलंका आणि बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Pakistan Airstrikes : पाकिस्तानचा पुन्हा एअरस्ट्राईक, खेळाडूंवर टाकले बॉम्ब, ८ अफगाण खेळाडूंचा मृत्यू

ST Buses : टेस्लावाल्या नेत्यांनो जरा एसटीकडेही लक्ष द्या, लाल परीची दयनीय अवस्था

Nashik : आता शत्रूची खैर नाही! नाशिकचं स्वदेशी तेजस, पाकिस्तानला धडकी

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

SCROLL FOR NEXT