India vs Pakistan, Asia Cup 2023 Saam tv
क्रीडा

India vs Pakistan Match: भारत- पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट! पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होणार?

India vs Pakistan, Asia Cup 2023: भारत पाकिस्तान सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

India vs Pakistan, Asia Cup 2023:

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया चषकातील सुपर ४ फेरीत आमने सामने येणार आहेत. हा महामुकाबला येत्या १० सप्टेंबर रोजी कोलंबोच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

भारत - पाकिस्तान या सामन्यासाठी रिजर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. या सामन्याच्या दिवशी पाऊस पडल्यास हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार आहे. (India vs Pakistan)

क्रिकइन्फोच्या वृ्त्तानूसार केवळ भारत-पाकिस्तान सामन्यासाठी रिजर्व्ह डेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगला होता.

हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आले होते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य बाब म्हणजे सुपर ४ फेरीत केवळ भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी रिजर्व्ह डे असणार आहे.

आशिया चषकातील सुपर ४ सामन्यात भारत आणि पाकिस्तान सामना हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्यात ९० टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे हा सामना होणं कठीण दिसून येत आहे. जर पाऊस पडून थांबला तर, षटकं कमी केली जातील. जर पावसाचं प्रमाण वाढलं तर हा सामना रद्द देखील केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत हा सामना रिजर्व्ह डे त्या दिवशी खेळवला जाईल. (Latest sports updates)

भारतीय संघाचे सुपर ४ फेरीतील सामने..

भारतीय संघाने ३ गुणांसह सुपर फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तान विरूद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर भारताचा संघ नेपाळविरूद्ध २ हात करण्यासाठी मैदानावर उतरला होता.

सुपर फेरीत पाकिस्ताविरूद्धचा सामना झाल्यानंतर १२ सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी भारताचा सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना बांगलादेश संघाविरूद्ध रंगणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना येत्या १७ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT