IND Vs PAK Final x
Sports

मोठी बातमी! भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नाही, कारण आलं समोर

india vs pakistan : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशाच्या समर्थनात पाकिस्तानने निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

टी20 वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यात आलाय

१५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणार होता सामना

पाकिस्तान सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तानचा खेळण्यास नकार

टी२० वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होणार नाही. दोन्ही संघाचा सामना येत्या १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणार होता. आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडची स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. याच्या विरोधातच पाकिस्तानने भारताच्या विरोधात खेळणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान सरकारने रविवारी मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान संघ टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे. परंतु पाकिस्तानने भारताविरोधात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तान सरकारच्या क्रिकेट बोर्डाने बांगलादेश संघाला स्पर्धेतून हटवल्यानंतर निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकारने भारतात खेळण्यावरून सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

पाकिस्तानी सरकारने 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकार पाकिस्तान क्रिकेट टीमला आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत २०२६ मध्ये सहभाग होण्यास परवानगी देत आहे. परंतु पाकिस्तान क्रिकेट टीमला १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्याला परवानगी देणार नाही. त्यामुळे पाकिस्तानी संघ भारताच्य विरोधात मैदानात उतरणार नाही'.

पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप संघ:

सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, ख्वाजा मोहम्मद नफे (विकेटकिपर), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर झमान, नसीम शाह, साहिबजादा फरहान, साइम अय्यूब, शादाब खान, उस्मान खान ( विकेटकिपर) ,उस्मान तारिक,शाहीन शाह आफ्रिदी

 भारत विरुद्ध पाकिस्तान सामना का रद्द करण्यात आला?

पाकिस्तान सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध खेळणार नसल्याचा निर्णय घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT