shubman gill twitter
Sports

IND vs PAK: चल निघ...गिलला आऊट केल्यानंतर अबरारचा तो इशारा पाहून नेटकरी संतापले - VIDEO

Abrar Ahmed Celebration: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात गिलला बाद केल्यानंतर अबरारने असं काही सेलिब्रेशन केलं जे पाहून नेटकरी संतापले.

Ankush Dhavre

भरतीय वनडे संघाचा उपकर्णधार शुभमन गिल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. जेव्हापासून त्याला ही जबाबदारी मिळाली आहे, तेव्हापासून त्याच्या फलंदाजीतही ही जबाबदारी दिसून आली आहे. गेल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळताना त्याने शानदार शतकी खेळी केली आणि नाबाद राहुन भारताला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याला शानदार सुरुवात मिळाली होती. मात्र या सुरुवातीचं रुपांतर तो मोठ्या खेळीत करु शकला नाही. त्याला ४६ धावांवर बाद होऊन माघारी परतावं लागलं.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४२ धावांची गरज होती. भारतासाठी हे आव्हान फार मोठं नव्हतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली. दोघांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र ३१ धावांवर भारताला पहिला मोठा धक्का बसला. रोहित २० धावांवर तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिलची जोडी मैदानात आली.

गिलला बाद केल्यानंतर अबरारचं ते सेलिब्रेशन

शुभमन गिल सध्या वनडेतील नंबर १ चा फलंदाज आहे. गेल्या ४ सामन्यांमध्ये त्याने २ शतकं आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत. या सामन्यातही त्याची अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल सुरु होती. मात्र ४६ धावांवर त्याला तंबूत परतावं लागलं. तर झाले असे की, १८ वे षटक सुरु असताना पाकिस्तानकडून अबरार अहमद गोलंदाजीला आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अबरारने गुगली टाकली.

मात्र गिल टर्नसाठी खेळायला गेला. त्यामुळे तो त्रिफळाचीत झाला. दरम्यान गिल बाद झाल्यानंतर अबरारने केलेलं सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अबरारने गिलकडे पाहिलं आणि नजरेने त्याला, चल निघ.. असा इशारा केला. या सेलिब्रेशनमुळे क्रिकेट फॅन्स त्याला ट्रोल करताना दिसून येत आहेत.

विराटसोबत अर्धशतकी भागीदारी

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिलने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चांगल्या चेंडूंना सन्मान दिला. तर इकडे तिकडे टाकलेले चेंडू सीमापारही पोहोचवले. दोघांनी मिळून ६९ धावा चोपल्या. या भागीदारीमुळे भारतीय संघ सामन्यात टीकून राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT