IND vs PAK Asia Cup 2025 x
Sports

No Handshake मुळे भारतावर कारवाई होणार? वाचा ICC चा नियम काय सांगतो

Asia Cup 2025: आशिया कप २०२५ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानसोबत हस्तांदोलन करण्यास नकार देत हा विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना समर्पित केला.

Namdeo Kumbhar

  • आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला.

  • भारतीय खेळाडूंनी सामना संपल्यानंतर पाकिस्तानसोबत हस्तांदोलन टाळले.

  • सूर्यकुमार यादवने विजय भारतीय सैन्याला समर्पित केला.

  • पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंचा निर्णय.

  • आयसीसीच्या नियमांनुसार हस्तांदोलन बंधनकारक नसल्याने मोठी कारवाई होण्याची शक्यता नाही.

Why Team India refused handshake with Pakistan Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडियाने आशिया चषकात पाकिस्तानला चारीमुंड्या चित केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतीयांच्या मनात संतापाची लाट होती. पाकिस्तानविरोधातील सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी देशभरातून होत होती. भारतीय संघातील खेळाडूंच्या मनातही वेदना होत्याच. सूर्यकुमार यादव आणि संघाने पाकिस्तानला मैदानावर सर्वच बाजूने पछाडले. सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीवेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याच्याकडे पाहिलेही नाहीत. सूर्याने त्यावेळी पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हात मिळवलाच नाही. त्यानंतर सामन्यानंतरही भारताच्या एकाही खेळाडूने पाकिस्तानच्या खेळाडूसोबत हातमिळवणी केली नाही.

टीम इंडियाच्या या कृतीने अनेक भारतीयांची मने जिंकली गेली. सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर हा विजय भारतीय जवानाला समर्पित असल्याचे सांगत देशाचे मन जिंकले. १२७ या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सात विकेटने विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने खणखणीत षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. षटकार मारल्यानंतर सूर्याने थेट ड्रेसिंग रूम गाठली. त्याने आणि दुबे यांनी पाकिस्तानच्या खेळाडूसोबत हात मिळवलाच नाही. संपूर्ण टीम इंडियाने पाकिस्तानच्या संघावर जणू बहिष्कारच घातला होता. भारताच्या एकाही खेळाडूने त्यांच्यासोबत हात मिळवला नाही. पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर थांबले पण भारताचे खेळाडू थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले. या कृतीनंतर भारतात कौतुक झाले पण हा नियमाचा भंग मानला जाते. भारतीय संघावर काय कारवाई होऊ शकते?

सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू सहसा एकमेकांशी हस्तांदोलन करून खिलाडूवृत्ती दाखवतात. रविवारी सामना संपल्यानंतर पाकिस्तानी संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ भारतीय खेळाडूची वाट पाहत होते. पण संपूर्ण भारतीय संघ थेट मैदानावरून ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि दरवाजे बंद केले. त्याआधी नाणेफेकीच्या वेळीही सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा यांनी हस्तांदोलन केले नव्हते. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, संघ मैदानावर खेळण्यासाठी आला होता आणि त्यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. आयुष्यात काही गोष्टी, भावना खिलाडूवृत्तीपेक्षा मोठ्या असतात. आमचा संपूर्ण संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत उभा आहे. हा विजय भारतीय सैन्याला समर्पित करतो. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पूर्ण केले होते.

भारतीय संघावर काय कारवाई होणार ? ICC rules on handshake boycott in cricket matches

हस्तांदोलन करणे अनिवार्य नाही, असे ICC च्या नियमांमध्ये असा कोणताही उल्लेख नाही. अशा परिस्थितीत चेतावणी, दंड किंवा सामना बंदीचा उल्लेख करणे योग्य ठरणार नाही. सामन्यापूर्वी किंवा नंतर खेळाडू आणि पंच केवळ खेळातील भावना लक्षात घेऊन हस्तांदोलन करतात. ही परंपरा क्रिकेटसह इतर खेळांमध्येही दिसून येते. जर खेळाडू मुद्दाम हस्तांदोलन करत नसतील, तरच ते खेळातील भावनेच्या विरुद्ध मानले जाऊ शकते. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.1.8 नुसार, असे वर्तन खेळातील भावनेच्या विरोधात आणि खेळाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे मानले जाते. याला लेव्हल-1 आणि लेव्हल-2 मध्ये वर्गीकृत केलेय. लेव्हल-1साठी चेतावणी देऊन सोडले जाऊ शकते किंवा 2,000 डॉलरपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तर लेव्हल-2 च्या प्रकरणात सामन्याच्या मानधनाचा 100 टक्के दंड आणि डिमेरिट पॉइंट्स मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rule Change: आजपासून UPI मध्ये मोठा बदल! जाणून घ्या नवीन सुविधा आणि नियम

Maharashtra Live News Update: बीड जिल्ह्यात धुवाधार पावसामुळे सीना नदीला पूर

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; २५ वर्षीय अभिनेत्रीवर सिनेमात काम देण्याचं आमिष देऊन ३ वर्ष अत्याचार केल्याचा आरोप

Nandurbar : बनावट कागदपत्रांचा आधारे मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती; नंदुरबार शिक्षण विभागाचा बोगस कारभार

Navratri 2025: नवरात्रीमध्ये घरी आणा या गोष्टी, माता लक्ष्मीच्या कृपेने होईल लाभ

SCROLL FOR NEXT