Ind vs Pak, Asia Cup 2023 Twitter
Sports

Ind vs Pak, Asia Cup 2023: पाकिस्तानचे ८ गडी बाद, १८ ओव्हर शिल्लक; तरीही टीम इंडिया विजयी, असं काय घडलं?

India vs Pakistan News In Marathi: भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तान संघावर २२८ धावांनी विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

Ind vs Pak, Asia Cup 2023:

आशिया चषकातील सुपर ४ चा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत पाकिस्तान संघावर दबाव बनवून ठेवला.

पहिल्या डावात विराट - राहुलच्या फटकेबाजीनंतर दुसऱ्या डावात कुलदीप यादवच्या फिरकी गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. यासह भारतीय संघाने या सामन्यात २२८ धावांनी विजय मिळवला आहे.

भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला अवघ्या १२८ धावा करता आल्या. ३२ व्या षटकात पाकिस्तानचा ८ वा विकेट गेला. इथून पुढे १८ षटके शिल्लक होती.

पाकिस्तानच्या २ विकेट्स शिल्लक होत्या. तरी भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आलं. यामागचं कारण असं की, राखीव दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच हॅरिस रउफ दुखापतीमुळे मैदानावर उतरला नव्हता.

तर नसीम शाहने ९.२ षटके गोलंदाजी केली. मात्र त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं. हेच कारण दोघेही फलंदाजीला येऊ शकले नाहीत. (Latest sports updates)

भारताचा जोरदार विजय..

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १२२ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले. तर केएल राहुलने नाबाद १११ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १२ चौकार आणि २ षटकार मारले. तर सलामीला आलेल्या रोहित शर्माने आणि गिलने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

गिलने या डावात आणि रोहितने ५६ धावांची खेळी केली. भारतीय संघाने पहिल्या डावात २ गडी बाद ३५६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फखर जमानची २७ धावांची खेळी ही सर्वोत्तम खेळी ठरली.

तर सलमान आगा आणि इफ्तिकार अहमदने २३ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT