क्रीडा

Ind Vs NZ 1st T20: Team India ने टॉस जिंकला, हार्दिकचा चकित करणारा निर्णय; अशी आहे प्लेईंग 11

या मैदानावर खेळल्या गेलेल्या 28 T20 सामन्यांमध्ये, फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 च्या वर धावा करता आल्या आहेत.

Gangappa Pujari

Ind Vs NZ T20 Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीएस मैदानात सुरु होत असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक फायदेशीर नाही. (Hardik Pandya)

वन डे मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, यावेळी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला किवींचा सामना करायचा आहे.

त्यामुळे यजमानांसाठी हे आव्हान सोपं नक्की नसेल. २००७ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी२० सामना खेळला गेला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये २२ सामने खेळले गेले. त्यापैकी १२ सामने भारताने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला ९ सामने जिंकण्यात यश आले. या २२ पैकी केवळ एक सामना अनिर्णित राहिला.

कशी आहे खेळपट्टी...

रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक फायदेशीर नाही. याठिकाणी फिरकीपटूंना अधिक फायदा मिळत असल्याचं दिसून आलं आहे. पण खेळपट्टीची एकूण परिस्थिती पाहता फलंदाजांना अधिक फायदा होतो. महत्वाचे म्हणजे , या मैदानावर खेळल्या गेलेल्या 28 T20 सामन्यांमध्ये, फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 च्या वर धावा करता आल्या आहेत.

भारताचे पारडे जड...

२००७ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी२० सामना खेळला गेला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये २२ सामने खेळले गेले. त्यापैकी १२ सामने भारताने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला ९ सामने जिंकण्यात यश आले. या २२ पैकी केवळ एक सामना अनिर्णित राहिला.

त्याचबरोबर या मैदानावर टीम इंडिया आतापर्यंत टी-20 मध्ये अजिंक्य आहे. भारताने रांचीमध्ये तीन सामने खेळले असून ते जिंकण्यात त्यांना यश आले आहे. या मैदानावर भारतीय संघाने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे.

अशी आहे प्लेईंग ईलेवन-

भारत- ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग (Indian Team)

न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT