India vs New zealand Team : Semi final toss prediction and pitch report Indian cricket players | men in blue
क्रीडा

IND vs NZ Toss Prediction: टॉस ठरणार बॉस! सेमीफायनल जिंकण्यासाठी टीम इंडियाने प्रथम काय करायला हवं?

Ankush Dhavre

India vs New Zealand, World Cup Semi Final Toss Prediction:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना आज (१५ नोव्हेंबर) रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. दुपारी २ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पण दुपारी १:३० वाजता होणारा टॉस हा निर्णायक असणार आहे. काय आहे यामागचं प्रमुख कारण? जाणून घ्या.

वानखेडेच्या मैदानावर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ४ सामने खेळवले गेले आहेत. हे चारही सामने डे - नाईट सामने होते. या सामन्यांमध्ये एक साम्य पाहायला मिळालं. ते म्हणजे, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने धावांचा डोंगर उभारला. तसेच पहिल्या डावात फलंदाजी करणं सोपं होतं. तर धावांचा पाठलाग करणं कठीण राहिलं आहे. (India vs New Zealand Toss Prediction)

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत असा राहिलाय रेकॉर्ड..

या स्पर्धेतील ३ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने मोठी धावसंख्या उभारली आहे. तर केवळ एकाच संघाला धावांचा पाठलाग करताना विजय मिळवता आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला होता. मात्र चिंता वाढवणारं कारण म्हणजे, अफगाणिस्तानने १०० धावांच्या आत ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज तंबूत पाठवले होते. (Latest sports updates)

पिच रिपोर्ट..

वानखेडेच्या मैदानावर जो टॉस जिंकेल तोच संघ सामना जिंकण्याची शक्यता अधिक असणार आहे. इथे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणं जास्त फायदेशीर ठरेल. कारण दुसऱ्या डावात गोलंदाजांचे स्विंग होणारे चेंडू फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतात. सुरुवातीचे २० षटक खेळून काढल्यानंतर पुढील ३० षटक फलंदाजी करणं सोपं आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT