Hardik Pandya Arshdeep Singh Saam TV
क्रीडा

IND vs NZ T20 : दुसऱ्या टी-20 सामन्यातून अर्शदीपसह 'या' खेळाडूला डच्चू? पांड्या मोठा निर्णय घेणार!

पहिल्या सामन्यातील पराभव टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

Satish Daud

IND vs NZ T20 : वनडे सीरिजमध्ये न्यूझीलंडला धोबीपछाड दिल्यानंतर टीम इंडिया टी-20 मालिकेसाठी सज्ज झाली खरी, पण पहिल्याच टी-20 सामन्यांत त्यांना न्यूझीलंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मालिकेत वरचढ दिसणाऱ्या टीम इंडियाच्या गोलंदाजांना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अक्षरश: धुवून काढलं. टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहला तर ४ षटकांत ५१ धावा पडल्या.  (India vs New Zealand 1st T20I)

दरम्यान, पहिल्या सामन्याचा पराभव टीम इंडियाचा (Team India) कर्णधार हार्दिक पांड्या याच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. हार्दिकने पराभवाचे खापर कुणावर फोडले नसले तरी, त्याच्या बोलण्यातून कुणामुळे टीम इंडियाचा पराभव झाला हे दिसून येत होते. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यांत हार्दिक पांड्याने प्लेईंग 11 मध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहे.

रांचीत खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यांत न्यूझीलंडने भारतासमोर  (IND vs NZ)  विजयासाठी १७६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. आव्हानाचा पाठलाग करताना, टीम इंडियाची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. वनडे सीरिजमध्ये दमदार फॉर्ममध्ये दिसणारा शुभमन गिल स्वस्तात बाद झाला. याशिवाय युवा इशान किशन सुद्धा आपली विकेट्स देऊन बसला.

त्यामुळे टीम इंडियाच्या मधल्या फळीवर दडपण आले. वनडे सामन्यांत भन्नाट फॉर्म दाखवलेल्या शुभमन गिलची टी-20 मध्ये फारशी चांगली कामगिरी राहिलेली नाही, त्यामुळे आता हार्दिक पांड्या शुभमन गिलच्या जागी दुसऱ्या सलामीवीराचा विचार करू शकतो.

दुसऱ्या टी-20 सामन्यांतून अर्शदीप सिंहचा पत्ता कट?

पहिल्या सामन्यांत फलंदाजीबरोबरच टीम इंडियाची गोलंदाजी सुद्धा अत्यंत खराब झाली. एकोणीसाव्या षटकापर्यंत टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड होती. पण २० व्या षटकांत युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने तब्बल २७ धावा दिल्या. न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज डॅरेन मिचेलने त्याला धुवून काढलं. त्यामुळे न्यूझीलंडला १७६ धावांपर्यंत मजल मारता आली.

अर्शदीप, गिलच्या जागी कुणाला मिळणार संधी?

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यांत शुभमन गिलच्या जागी युवा सलामीवर फलंदाज पृथ्वी शॉला खेळण्याची संधी मिळू शकते. पृथ्वीने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार फॉर्म दाखवला होता. त्याचबरोबर अर्शदीप सिंहच्या जागी टीम इंडियाचे हेड कोच मुकेश कुमारला संधी देण्याचा विचार करत आहेत. मुकेश कुमार हा अष्टपैलू खेळाडू असून त्याला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने मोठी बोली लावून संघात सामील करून घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT