IND vs NZ 3rd T20  Saam TV
क्रीडा

IND vs NZ 3rd T20 : मोदी स्टेडियमवर गिलचा धुमाकूळ; ५४ चेंडूत ठोकलं शतक, न्यूझीलंडसमोर २३५ धावांचं आव्हान

शुभमन गिलने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलची धुलाई केली.

Satish Daud

IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा निर्णायक टी-२० अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर धावांचं २३५ आव्हान ठेवलं आहे. पहिल्या दोन सामन्यांत स्वस्तात माघारी परतणाऱ्या शुभमन गिलने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलची धुलाई केली. शुभमने टी-२० पहिलं शतक झळकावताना 63 चेंडूत धावा १२६ कुटल्या.  (IND vs NZ 3rd T20)

शुबमन गिलने १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. शुबमनने शतक साजरे करताच कर्णधार हार्दिकने त्याचे अभिनंदन केले तर डगआऊट मधून प्रशिक्षक राहुल द्रविड तसेच इतर संघ सहकाऱ्यानी देखील त्याचे अभिनंदन केले. तिन्ही फॉरमॅट मध्ये शतक करणारा शुबमन पाचवा खेळाडू ठरला आहे.

शुभमन गिलला राहुल त्रिपाठी (४४ धावा) आणि हार्दिक पांड्याची (३० धावा) सुरेख साथ लाभली. या तीन फलंदाजांनी मिळून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. शुभमन गिलची फटकेबाजी न्यूझीलंडचा एकही गोलंदाज रोखू शकला नाही. राहुल त्रिपाठीने २२ चेंडूत ४४ धावा कुटल्या, तर हार्दिक पांड्याने १६ चेंडूत ३० धावा ठोकल्या.

सलामीवर शुभमन गिल अखेरपर्यंत नाबाद राहिला गिलने ६३ चेंडूत १२६ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार ठोकले. त्याच्या या दमदार खेळीच्या बळावर टीम इंडियाने २० षटकांत ४ बाद २३४ धावा केल्या. दरम्यान, आजच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण, पृथ्वी शॉ याला तिन्ही सामन्यात बाकावरच बसवून ठेवले गेले.

फिरकीपटू युझवेंद्र चहल याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करत उमरान मलिकला संधी दिली गेली. मागील सामन्यात युजवेंद्रने भारताकडून टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम नावावर केला होता आणि आज त्याला बाहेर केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. एकदिवसीय मधील दोन द्विशतकवीर इशान किशन आणि शुबमन गिल टी२० मध्ये सतत फ्लॉप होत होते. यानंतरही संघ व्यवस्थापनाने त्याला पुन्हा एकदा सलामीच्या फलंदाजीसाठी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र किशनला त्याचा फायदा उठवता आला नाही. शुबमनने पुरेपूर फायदा घेत शतकांची मालिका सुरूच ठेवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

SCROLL FOR NEXT