India vs New Zealand 3rd ODi Twitter
Sports

India vs New Zealand 3rd ODI : रोहित-गिलने धू धू धुतलं; टीम इंडियाचं न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचं आव्हान

टीम इंडियाच्या रोहित-गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगलाच धुतला. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचं आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

India vs New Zealand 3rd ODI : टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये एक दिवसीय मालिकेचा तिसरा सामना सुरू आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज तुफान फॉर्ममध्ये दिसले. टीम इंडियाच्या रोहित-गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगलाच धुतला. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

भारत (Team India) आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरमधील होळकर मैदानावर खेळवला जात आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय न्यूझीलंडच्या चांगलाच अंगलट आला. कारण, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सलामीवर शुभमन गिलने टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली.

पहिल्या दोन सामन्यांत दमदार फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलकडून या सामन्यातही चांगल्या खेळीची क्रिकेटप्रेमींना आशा होती. कर्णधार रोहित शर्माने ८३ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतर शुभमन गिलने देखील शतक पूर्ण केलं. गिलने एक दिवसीय क्रिकेट करिअरमधील चौथं शतक ठोकलं. त्यानंतर २१२ धावांवर रोहितच्या रुपाने भारताचा पहिला धक्का बसला. त्यानंतर शुभमन ११२ धावा करून झेलबाद झाला.

टीम इंडियाचे दोन गडी बाद झाल्यानंतर तिसरा गडी ईशान स्वस्तात माघारी परतला. ईशान किशन अवघ्या १७ धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली ३६ धावा करून बाद झाला. २९३ धावांवर टीम इंडियाचा अर्धा संघ गारद झाला. टीम इंडियाचा सूर्यकुमार यादव देखील फारसं चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. सूर्यकूमार १४ धावांवर झेलबाद झाला.

टीम इंडियाची पडझड हार्दिक पंड्याने थांबवली. शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पंड्याने काही काळ टीम इंडियाची कमान चांगली सांभाळली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी रचली. त्यानंतर शार्दुल ठाकूर २५ धावा करून तंबूत परतला. टीम इंडियाच्या फलंदाजांच्या जोरदार फलंदाजींच्या जोरावर टीम न्यूझीलंडला ३८६ धावांचं आव्हान दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : पाथर्डीत तालुक्यात अतिवृष्टीचा कहर; करंजी परिसरातील अनेकांचे संसार उघड्यावर, शेतीचेही मोठे नुकसान

Maharashtra Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

Good news for Mumbaikars! मुंबईत आजपासून धावणार ई-बाईक , तिकिट फक्त 15 रुपये, वाचा सविस्तर

High Speed Train: १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात; हाय स्पीड ट्रेनने प्रवास होणार सुसाट

Navratri 2025: 21 की 22 सप्टेंबर, यंदा कधी आहे नवरात्री उत्सव? जाणून घ्या तारीख अन् घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT