Team India Playing 11 prediction against New zealand saam tv
Sports

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

India Vs New Zealand 1st ODI Match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असणार आहे, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

Nandkumar Joshi

India vs New Zealand 1st ODI Playing XI Prediction : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वडोदरामध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाचे खेळाडू शहरात पोहोचले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे मालिकेत खेळणार आहेत. त्यामुळं सध्यातरी या दोघांकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याचवेळी पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार आहे, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कोणकोणते ११ खेळाडू मैदानात उतरतील, कुणाला बाकावर बसावे लागेल, याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो एकच सामना खेळला आहे. त्याचा फॉर्म अद्यापही हरवलेलाच आहे. त्यामुळं या मालिकेत त्याच्या कामगिरीवर लक्ष राहणार आहे. भारतीय संघासाठी तो पुन्हा ओपनिंग करताना बघायला मिळणार आहे. तर माजी कर्णधार रोहित शर्मा त्याच्या जोडीला सलामीला मैदानात उतरू शकतो. भारताची सलामीची जोडी निश्चित आहे. त्यामुळं यशस्वी जयस्वालला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याला बाकावरच बसावे लागणार आहे.

विराट कोहली तिसऱ्या स्थानी फलंदाजीला, तर श्रेयस अय्यरचं कमबॅक

विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी विजय हजारे ट्रॉफीच्या दोन सामन्यांत एक-एक शतक ठोकले आहे. ते दोघेही जबरदस्त फॉर्मात आहेत. या मालिकेची सुरुवातही धमाकेदार करतील यात शंका नाही. हे दोघेही मोठी खेळी करून मालिका जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला येईल. दुखापतीतून सावरून श्रेयस अय्यर मैदानात उतरतोय. तो कशाप्रकारे खेळतोय याकडेही लक्ष असेल.

केएल राहुलला संधी, रिषभ पंत बाहेर?

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेटकीपरसाठी दोन पर्याय आहेत. केएल राहुल आणि रिषभ पंत या दोघांनाही टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये दोघांपैकी एकालाच संधी मिळू शकते. केएल राहुलला संधी दिली जाईल असे चित्र आहे. रिषभ पंत बॅकअप विकेटकीपरच्या भूमिकेत या मालिकेत दिसू शकतो. याचाच अर्थ पहिल्या सामन्यात रिषभ पंतला बाहेर बसावे लागू शकते.

तीन ऑलराउंडर, तगडा संघ

ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. त्यामुळं भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन आणखी तगडी होऊ शकते. तर वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग यांच्याकडे असेल. हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा हे देखील संघात आहेत, पण सुंदर आणि जडेजाला संधी दिली तर राणाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. स्पिनर म्हणून कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. दरम्यान, अंतिम प्लेइंग इलेव्हनचे पत्ते ११ जानेवारीला सामन्याच्या दिवशी दुपारीच उघड होतील. त्यामुळे प्लेइंग ११ मध्ये कुणाला संधी मिळते, कुणाला बाकावर बसावं लागतं, याबाबत खेळाडूंमध्ये प्रचंड चुरस आणि चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT