२० षटकार, ११ चौकार....वर्ल्डकपच्या आधी हार्दिक पंड्याची त्सुनामी, VIDEO

Hardik Pandya storm before t20 world cup : टी २० वर्ल्डकपआधी हार्दिक पंड्या जबरदस्त फॉर्मात आला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये चंदीगडच्या विरोधात त्यानं अवघ्या ३१ चेंडूंत ७५ धावा कुटल्या. त्यामुळं बडोदा संघ भक्कम स्थितीत पोहोचला. तर आतापर्यंतच्या दोन सामन्यांत पंड्यानं २० षटकार आणि ११ चौकार ठोकले आहेत.
Hardik Pandya inform batsman Video
Hardik Pandya inform batsman Videosaam tv
Published On

भारतीय संघाचा ऑलराउंडर आणि स्फोटक फलंदाज हार्दिक पंड्या यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये ८ जानेवारीला चंदीगडच्या विरोधात बडोदासाठी खेळताना आणखी एक तुफानी इनिंग खेळली. एलिट ग्रुप बीच्या अंतिम सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या हार्दिकने अवघ्या ३१ बॉलमध्ये ७५ धावा कुटल्या आणि सामन्याचा निकालच बदलला. याआधी हार्दिकने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शतक ठोकलं होतं. म्हणजेच टी २० वर्ल्डकपच्या आधी विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांत हार्दिकने २० षटकार आणि ११ चौकार ठोकले आहेत.

१९ बॉलमध्येच हाफसेंच्युरी

बडोदाकडून खेळणाऱ्या हार्दिकने मैदानात उतरताच आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. अवघ्या १९ बॉलमध्ये त्यानं अर्धशतक पूर्ण केलं. त्यात ९ उत्तुंग षटकार आणि दोन चौकार लगावले. २४० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं त्यानं या धावा तडकावल्या. बडोदा संघाच्या वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर संघाची धावगती मंदावली होती. त्याचवेळी हार्दिकने आक्रमक फलंदाजी करून सामनाच फिरवला. प्रियांशू मोलिया याच्या साथीने पंड्याने पाचव्या विकेटसाठी ५१ बॉलमध्ये ९० धावा जोडल्या. त्यामुळं बडोदा संघाला निर्णायक आघाडी मिळाली.

५ दिवसांपूर्वीच झळकावलं होतं शतक

हार्दिक पंड्या सध्या जबरदस्त फॉर्मात असून, त्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस पडत आहे. पाच दिवसांपूर्वीच विदर्भ संघाच्या विरोधात पंड्याची बॅट तळपली होती. अवघ्या ६८ बॉलमध्ये त्याने शतक ठोकलं होतं. त्यात ११ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. त्याने १३३ धावांची आक्रमक खेळी केली होती. पण त्या सामन्यात बडोदाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Hardik Pandya inform batsman Video
Hardik Pandya Out : हार्दिक पंड्याला वनडे संघात का घेतलं नाही?; BCCI सांगितलं महत्वाचं कारण

हार्दिक पंड्याचा डोमेस्टिक क्रिकेटमधील फॉर्म सध्या लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण हार्दिकने मागील पाच सामन्यांत चार वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर त्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस पडत आहे. हार्दिकच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळं त्याचा भारतीय संघातील दावा अधिक मजबूत झाला आहे, असे म्हणावे लागेल.

Hardik Pandya inform batsman Video
IPL 2026 : मुस्तफिजूरला काढलं, बांगलादेश चिडला! आयपीएल टेलिकास्टवर अनिश्चित काळासाठी बंदी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com