T20 World Cup 2022 News: टी-२० विश्वचषकाची रणधुमाळी सुरू आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) भारतानं २३ ऑक्टोबरला पाकिस्तानला धुळ चारत भारतीयांना दिवाळी गिफ्ट दिलं होतं. पाकिस्तानशी झालेल्या अतितटीच्या सामन्यात भारतानं ४ विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानला पराभवाची धुळ चारल्यानंतर आता टीम इंडिया नेदरलँड्सला हरवून भारतीयांना दुसरं दिवाळी गिफ्च देण्यास तयार आहे. (Indian Cricket News)
भारतीय संघ (Team India) आज म्हणजे, गुरुवारी 27 ऑक्टोबरला टी-20 विश्वचषकातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सशी भिडणार आहे. या स्पर्धेतील हा २३ वा सामना असेल. ऐतिहासिक अशा सिडनी क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. नेदरलँड्स प्रथमच टी-20 फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध खेळणार आहे. वनडेमध्ये दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाने 2003 आणि 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सचा पराभव केला होता.
भारताने स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध (India Vs Pakistan T20 World Cup) कम्माल विजय मिळवला. या हायप्रेशर सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. अर्शदीप सिंग आणि अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही गोलंदाजीत कमाल केली. पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाची नजर नेदरलँडविरुद्धच्या मोठ्या विजयाकडे असेल.
याआधीही भारताने दोनवेळा नेदरलँड्सचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे जेव्हा-जेव्हा भारताने वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सचा पराभव केला आहे, तेव्हा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. 2011 मध्ये भारत चॅम्पियन बनला होता, तर 2003 च्या फायनलमध्ये भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता.
भारत आणि नेदरलँड्स यांच्यात आज म्हणजेच गुरुवारी २७ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. सिडनीतील सिडनी क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता हा सामना सुरु होईल, त्याआधी 12:00 नाणेफेक वाजता होईल.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे T20 विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. हिंदी आणि इंग्रजी आणि मराठी व्यतिरिक्त, तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह भारत आणि पाकिस्तान सामना पाहू शकता मात्र यासाठी पैसे मोजावे लागतील. जर तुम्हाला हा सामना फ्रीमध्ये पाहायचा असेल तर डीडी स्पोर्ट्स या टीव्ही वाहिनीवर पाहता येईल. हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
विक्रमजीत सिंग, मॅक्स ओड, बास डी लीड, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, स्कॉट एडवर्ड्स (सी आणि डब्ल्यूके), टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद/रोलोफ व्हॅन डर मर्वे, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.