Shivsena Vs BJP: भ्रम पसरविण्याचा भाजपचा अश्लाघ्य प्रयत्न; 'त्या' बातमीवरुन सांवतांचा भाजपवर हल्लाबोल

Shivsena MP Arvind Sawant On BJP: कुठलीतरी बातमी घेऊन वाहिन्या वृत्त दाखवतात. नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भ्रम पसरविण्याचा भाजपचा अश्लाघ्य प्रयत्न..!" असं अरविदं सावंत यांनी आपल्या ट्विटमधून म्हटलं आहे.
Shivsena MP Arvind Sawant
Shivsena MP Arvind Sawantsaam tv
Published On

Shivsena Latest News: ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेली अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याची बातमी काल, बुधवारी अनेक प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर पसरली होती. याप्रकरणी आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ठाकरे गटाची बाजू स्पष्ट केली आहे. तसेच ही बातमी खोटी असल्याचंही सावतं म्हणाले आहेत. (Arvind Sawant Latest News)

Shivsena MP Arvind Sawant
Pandharpur News: पंढरपुरात ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण; ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सचे टायर फोडले

काल, बुधवारी सोशल मीडियावर ही बातमी पसरली होती, मात्र ही बातमी खोटी असल्याचा दावा खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी केला आहे. तसेच ही बातमी खोटी असून भाजपने ही बातमी मुद्दाम पेरली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

Shivsena MP Arvind Sawant
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; फॉरमॅट चुकल्याने अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी

आपली शिवसेना हीच खरी सेना असल्याचं सिद्ध करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांमार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. ही प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात ठाकरे गटाने आघाडी घेतली असली तरी ती निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये ही प्रतिज्ञापत्र नसल्याने तब्बल अडीच लाख अर्ज निरुपयोगी ठरल्याची बातमी समोर आली होती. मात्र ही बातमी खोटी (Fake News) असल्याचं खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत. तसेच याबाबत आदित्य ठाकरेंनीही ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.

Shivsena MP Arvind Sawant
Dombivli News : लक्ष्मीपूजना दिवशीच चोरट्यांनी मारला डल्ला; घरातले लोकं झोपताच साधला डाव

यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "प्रतिज्ञापत्रांच्या संदर्भातील बातमी ऐकली. खरे तर निवडणूक आयोगाचे कार्यालय ४ दिवस बंद आहे. प्रतिज्ञापत्र तपासणी व्हायची आहे. कुठलीतरी बातमी घेऊन वाहिन्या वृत्त दाखवतात. नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भ्रम पसरविण्याचा भाजपचा अश्लाघ्य प्रयत्न..!" असं अरविदं सावंत यांनी आपल्या ट्विटमधून म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com