वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आज साखळी फेरीतील शेवटचा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि नेदरलँड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. ८ पैकी ८ सामने जिंकून १६ गुणांसह भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे.
तर दुसरीकडे नेदरलँडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना सेमीफायनलपूर्वी होणारा सराव सामना असणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली जाऊ शकते.
हा सामना नेदरलँड संघासाठीही महत्वाचा असणार आहे. या सामन्यात विजय मिळवून नेदरलँडला २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रवेश करण्याची संधी असणार आहे. त्यासाठी त्यांना बांगलादेशला मागे सोडावं लागेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाला आहे. तर गुणतालिकेतील टॉप ७ संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. नेदरलँडचा गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. त्यामुळे नेदरलँडसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. (Latest sports updates)
भारतीय संघात होणार बदल?
भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यापूर्वी रणनीतीत कुठलेही प्रयोग केले जाणार नाहीत असं राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे. यासह त्यांनी काही खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत भाष्य केलं आहे.
संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवला विश्रांती दिली जाऊ शकते.आर अश्विन आणि प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव/आर अश्विन, जसप्रीत बुमराह/प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
या सामन्यासाठी अशी असू शकते नेदरलँड संघाची प्लेइंग ११:
मॅक्स ओ'डोउड, वेस्ले बरेसी, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंगलब्रेचट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), बास डी लीडे, तेजा निदामानुरु, लोगन वान बीक,वान डेर मेरवे, आर्यन दत्त, पॉल वान मीकरन
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.