अफगाणिस्तानला लोळवल्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात आज शुक्रवारपासून (२६ जून) होत आहे. पहिला सामना बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबच्या मैदानात होत आहे. भारताचा अवघ्या १५ वर्षांचा विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी या सामन्याद्वारे पदार्पण करणार का, याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. जर आज पदार्पण केलं तर, सचिन तेंडुलकरचा भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम वैभव मोडीत काढणार आहे. पण वैभवच्या पदार्पणात पाऊस खोडा घालू शकतो. बेलफास्टमध्ये वातावरण आलबेल नाही. भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यावर पावसाचं सावट आहे. हा सामना पावसामुळं रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत विरुद्ध आयर्लंड सामना भारतीय वेळेनुसार, आज संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. तर स्थानिक वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल. बेलफास्टचं हवामान त्या वेळेत खराब असणार आहे. अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, दुपारी १ ते संध्याकाळी ४ या वेळेत पावसाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब होणार आहे. तसेच सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यय येऊ शकतो.
स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता पावसाची शक्यता ४९ टक्के आहे. पुढील दोन तासांत वाढ होऊन ५९ आणि ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. बेलफास्टमध्ये आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास पावसाची शक्यता ५९ टक्के आहे. तर दुपारी तीन वाजता ५१ टक्के, तर ४ वाजता हवामानात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मैदान सुकण्यासाठी कमी वेळ असणार आहे. त्यामुळे पहिला टी २० सामना पावसामुळे रद्द केला जाऊ शकतो.
आयर्लंडविरुद्धच्या सामन्याआधीच्या सराव सत्रानंतर आलेल्या रिपोर्टनुसार, वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळू शकते. त्यामुळे पहिल्याच टी २० सामन्यात अभिषेक शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. डावखुरा आणि उजव्या हाताच्या फलंदाजाचे कॉम्बिनेशन ठेवण्यासाठी संजू सॅमसन वैभव सूर्यवंशीसोबत सलामीला येऊ शकतो. इशान किशन तिसऱ्या, श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानात उतरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.