england cricket team  saam tv news
Sports

IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड मालिका रद्द होणार? इंग्लंडचा संघ परदेशात जाणार! वाचा कारण

England Team Will Return To Abu Dhabi: भारत - इंग्लंड कसोटी मालिका पूर्ण होणार नाही? भारत - इंग्लंड कसोटी मालिका अर्ध्यातच संपणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Ankush Dhavre

India vs England Test Series:

भारत - इंग्लंड कसोटी मालिका पूर्ण होणार नाही? भारत - इंग्लंड कसोटी मालिका अर्ध्यातच संपणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामागचं कारण असं की, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर इंग्लंडने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डने हा निर्णय का घेतला? काय आहे हा निर्णय घेण्यामागचं नेमकं कारण? जाणून घ्या.

तर टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिका रद्द होणार नाहीये. ना या मालिकेतील वेळापत्रकात कुठला बदल होणार आहे. मात्र विशाखापट्टनममध्ये झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा संघ परदेशात जाणार हे नक्की आहे.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील २ सामने झाले असून पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक करत विजय मिळवला आहे. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. (Cricket news in marathi)

मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, इंग्लंडचा संघ तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी विश्रांती म्हणून अबूधाबीला जाणार आहे. इथे इंग्लंडचे खेळाडू गोल्फ देखील खेळणार आहेत. माध्यमातील वृत्तात असं म्हटलं गेलं आहे की, इंग्लंडचे काही खेळाडू आजारी आहेत. त्यामुळे रिफ्रेश होण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डने हा निर्णय घेतला आहे.

राजकोट कसोटी सुरू व्हायला आणखी १० दिवस शिल्लक आहेत. या १० दिवसात रिफ्रेश होण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. भारतात येण्यापूर्वी इंग्लंडने अबूधाबीमध्ये कसून सराव केला होता. इथेच त्यांनी भारतीय संघाला हरवण्याचा प्लान केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT