युवा खेळाडू शुभमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्याला २० जूनपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना लीड्सवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कोणत्या ११ खेळाडूंची निवड करतील हा सर्वात मोठा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर माजी क्रिकेटपटू आणि एक्स्पर्ट आकाश चोप्रानं देण्याचा प्रयत्न केला आहे. आकाश चोप्रानं प्लेइंग ११ मध्ये करूण नायरला संधी दिली नाही. इंग्लंड लॉयन्सच्या विरोधात अनौपचारिक कसोटी सामन्यात त्याने द्विशतक झळकावलं होतं.
करूण नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्या जोरावर त्यानं टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी आकाश चोप्रा यानं त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेलं नाही. जर शुभमन गिल हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तरच, करूण नायरला चौथ्या स्थानावर खेळण्याची संधी मिळू शकते, असा अंदाज चोप्रानं व्यक्त केला आहे.
आकाश चोप्राच्या अंदाजानुसार, सलामीला यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल हे दोघे येऊ शकतात. तिसऱ्या स्थानी साई सुदर्शनला खेळवले जाऊ शकते. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची जागा शुभमन गिल घेऊ शकतो. त्यामुळं कर्णधार म्हणून चौथ्या क्रमांकावर त्याला स्थान दिलेलं आहे. त्यानंतर विकेटकीपर ऋषभ पंत हा फलंदाजीला येऊ शकतो. सहाव्या क्रमांकावर नितीश कुमार रेड्डीला पसंती दिली आहे.
नितीश कुमार रेड्डी हा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तसेच तो काही षटके गोलंदाजीही करू शकतो. पण तो फलंदाज म्हणून जबाबदारी सांभाळू शकतो. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर या दोघांची ऑलराउंडर म्हणून निवड केलेली आहे. ठाकूर हा संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीही करू शकतो. याशिवाय तीन वेगवान गोलंदाजही निवडलेले आहेत. त्यात जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजला स्थान देण्यात आलं आहे.
रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर हे माझ्या दृष्टीने ऑलराउंडर आहेत. लीड्सच्या मैदानावरील परिस्थिती बघता शार्दुल ठाकूर हा प्रमुख गोलंदाज म्हणून भूमिका निभावेल, पण त्याचबरोबर फलंदाजीही करू शकतो. त्यानंतर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे प्रमुख गोलंदाज असतील, असे आकाश चोप्राचे म्हणणे आहे.
जर शुभमन गिल हा तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असेल तर, चौथ्या क्रमांकावर करूण नायरला खेळवायला हवा, असं आकाश चोप्रा म्हणाला.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.