Government Employees: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे नियम केले स्पष्ट; पेन्शनसाठी होणार फायदा

Government Employees Retirement Rule: केंद्र सरकारने पुन्हा एकदा सेवानिवृत्तीच्या नियमाबाबत एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये सर्व्हिस पीरियड कसा मोजला जातो यबाबत माहिती दिली आहे.
Government Employees
Government Employees Saam Tv
Published On

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे नियम स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवसाबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, कर्मचारी नेहमी एक प्रश्न विचारत असतात की, कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा किंवा मृत्यूचा दिवस हा सर्व्हिस पीरियडमध्य असतो की नाही. सरकारने आता याबाबतचे नियम स्पष्ट केले आहेत.

Government Employees
PF Balance Check: मिस्ड कॉल द्या अन् पीएफ बॅलेन्स चेक करा; सिंपल प्रोसेस करा फॉलो

सरकारने सांगितले की, ज्या दिवशी कर्मचारी निवृत्त होतो, तो त्याचा शेवटचा दिवस असतो. राजीनामा दिला किंवा मृत्यू झाला असेल तर तो त्याच्या सर्व्हिसचा शेवटचा दिवस म्हणून मोजला जातो. हा नियम केंद्रीय सिविल सेवा नियम २०२१ नुसार लागू आहे.

कर्मचारी पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची निवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे किंवा मृत्यू झाल्यास तो त्याचा शेवटचा दिवस मानला जाईल.

Government Employees
EPFO Rule: दिवाळीआधी गुड न्यूज! PF चे पैसे १०० टक्के काढता येणार, कागदपत्रांचीही गरज नाही, वाचा नवे नियम

रजा किंवा निलंबनाच्या बाबतीतील नियम काय?

निवेदनात म्हटलंय की, जर एखादा कर्मचारी निवृत्ती किंवा मृत्यूपूर्वी रजेवर असेल किंवा निंलंबित असेल तर तो रजेचा कालावधी किंवा निलंबनाचा कालावधी हे दिवस रजा किंवा निलंबन कालावधीचा भाग असेल. याचाच अर्थ की, तो दिवस वेगळ्या कामकाजाचा मानला जाणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची गणना करण्यासाठी हे महत्त्वाचे असते. पेन्शनची गणना ही सेवेच्या एकूण दिवसावर आधारित असते. अनेकदा मृत्यू झालेला किंवा निवृत्तीचा दिवस सर्व्हिसच्या कालावधीत गणला जाईल का असा प्रश्न विचारला जातो.त्यानंतर आता नियम स्पष्ट केले आहेत.

Government Employees
EPFO New Scheme: EPFO ने लाँच केली नवी योजना! कर्मचाऱ्यांना होणार फायदा; वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com