Shreya Maskar
जास्त प्रमाणात भात खाल्ल्यामुळे वजन वाढते. हेल्थ तज्ज्ञांच्या मते, भात खाण्याची योग्य वेळ जाणून घेऊयात. जेणेकरून वजन नियंत्रणात राहील आणि वाढलेले वजन कमी देखील होईल.
तांदूळ धुवताना त्याचा अतिरेक करू नये. त्यामुळे भातातील कॅलरीज आणि ग्लुकोज कमी होते. ज्यामुळे शरीराला नुकसान होते.
पॉलिश न केलेला तांदूळात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि आपले वजन देखील नियंत्रणात राहते.
फोडणीचा भात, पुलाव, बिर्याणी खाण्यापेक्षा वाफवलेल्या भाताचा आहारात समावेश करा. ज्यामुळे शरीराला चांगले पोषण मिळते.
फोडणीचा भात, पुलाव, बिर्याणी यात आपण तेलाचा वापर जास्त प्रमाणात करतो, ज्यामुळे वजन वाढते.
भाताचे सेवन दुपारच्या जेवनात करावे. यामुळे कार्ब्स, प्रोटीन मिळतात. ज्यामुळे संपूर्ण शरीर दिवसभर उत्साही राहते. महत्त्वाची गोष्ट भात खाल्ल्यानंतर १०-१५ मिनिटे चाला.
रात्रीच्या जेवणात भात खाणे टाळा. कारण भात पचायला जड जातो आणि रात्री आपण जास्त वेळ झोपतो. त्यामुळे हलका आहार घ्यावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.