Rohit Sharma - Virat Kohli India vs England
Rohit Sharma - Virat Kohli India vs England  SAAM TV
क्रीडा | IPL

भाई मला समजत नाही...; विराट कोहलीबद्दलच्या प्रश्नावर रोहित वैतागलाच

Nandkumar Joshi

मुंबई: लॉर्ड्सच्या मैदानावरील एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला १०० धावांनी पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर विराट कोहली पुन्हा अपयशी ठरल्यानंतर त्यावरून टीका होत आहे. चांगली सुरुवात होऊनही विराट कोहलीनं आपली विकेट गमावली. कोहलीने २५ चेंडूंमध्ये १६ धावा केल्या. पुन्हा विराट कोहली अपयशी ठरला. आता त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विराटच्या फॉर्मवरून कर्णधार रोहित शर्माला प्रश्न विचारला असता, माध्यमांना त्याने सडेतोड उत्तर दिले. विराट कोहलीबाबतच का चर्चा होत आहे. फॉर्ममध्ये असणे किंवा नसणे हा खेळाचा भाग आहे, असं प्रत्युत्तर रोहितनं दिलं. (Rohit Sharma On Virat Kohli)

भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. सामन्यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मबद्दल प्रश्न विचारला. त्यावर विराटच्या फॉर्मवर का बोलत आहेत? मला काहीही समजत नाही भाई...असे रोहित वैतागून म्हणाला. विराट इतक्या वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. जबरदस्त फलंदाज आहे. त्याला कोणत्याही ग्वाहीही गरज नाही. मागील सामन्यानंतरही मी हेच सांगितले होते. फॉर्ममध्ये चढ-उतार येतोच. हा खेळाचा भाग आहे. सर्व खेळाडूंच्या बाबतीत असेच झाले आहे, होत आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.

विराटचा फॉर्म नक्कीच परत येईल

रोहित शर्मा म्हणाला की, जो फलंदाज इतक्या वर्षांपासून खेळत आहे, इतक्या धावा त्याने केल्या आहेत. तो फॉर्ममध्ये येण्यासाठी केवळ एक किंवा दोन डावच पुरेसे आहेत, असे मला वाटते. आम्हाला ठाऊक आहे, चर्चा होतच असते. पण प्रत्येक खेळाडूची कामगिरी कमी-जास्त होत असते. पण जी क्वालिटी खेळाडूमध्ये असते ती कधीच खराब होत नाही.

दुसरीकडे फक्त रोहित शर्माच नव्हे तर पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज बाबर आझम याने देखील विराट कोहलीचं समर्थन केलं. त्याने ट्विट केलं आहे. वाइट वेळ नक्कीच निघून जाईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

विराट कोहली पुन्हा अपयशी

विराट कोहलीने लॉर्ड्स वनडेमध्ये चांगली सुरुवात केली होती. त्याने सुंदर फटके लगावले होते. तीन चौकार मारले होते. मात्र, एका चुकीमुळे तो पुन्हा अपयशी ठरला. डेविड विलीच्या बाहेरच्या चेंडूची कड लागली आणि विकेटकीपर जोस बटलरने झेल टिपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lemon Detergent: लिंबाच्या सालीपासून बनलेलं डिटर्जंट वापरा; भांडी चांदीसारखी चकाकतील

Today's Marathi News Live : Manoj Jarange: नाशिकमध्ये मु्ख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने

Mumbai Lok Sabha: ईशान्य मुंबईत भाजपला मोठा झटका; धार्मिक कार्यक्रमात मिहिर कोटेचा यांना मतदान करण्याचं आवाहन, गुन्हा दाखल

Madhya Pradesh News: घटस्फोटाच्या अर्जानंतर पतीविरोधातील तक्रार सूडाचे कृत्य नाही, हायकोर्टाने केलं स्पष्ट

Side Effects Of Bitter Gourd: कडू कारलं खाल्ल्यानंतर काय खाऊ नये?

SCROLL FOR NEXT