virat kohli twitter
Sports

IND vs PAK Highlights: दुबईत 'विराट'वादळ! शतकासह भारताचा शानदार विजय; पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफीतून एक्झिट

India vs Pakistan Highlights: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात विराटने शानदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर विराटने शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

जिथे विषय हार्ड असतो तिथे विराट खंबीरपणे उभा असतो. हे एकदा नाहीतर अनेकदा पाहायला मिळालं आहे. असंव काहीसं चित्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यादरम्यान पाहायला मिळालं.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव २४१ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना विराटच्या शानदार शतकी आणि श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून ४१ धावांची भागीदारी केली, यादरम्यान रोहितला २० धावा करता आल्या. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने मिळून अर्धशतकी भागीदारी केली. गेल्या सामन्यातील शतकवीर गिलने ५२ चेंडूंचा सामना करत ४६ धावा केल्या.

एका बाजूने विकेट्स जात होत्या, तर दुसऱ्या बाजूने विराट कोहलीने एक बाजू धरुन ठेवली होती. गिसोबत अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर, विराटने गिलसोबत मिळून मोर्चा सांभाळला. दोघांनी मिळून १०० हून अधिक धावा जोडल्या.

ही जोडी नाबाद राहून पाकिस्तानला हरवणार की काय, असं वाटू लागलं होतं. मात्र श्रेयस अय्यर ६७ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी करत माघारी परतला. दोघांनी मिळून भारतीय संघाला विजयाची वाट दाखवली. शेवटी विराटने भारतीय संघाच्या विजयाचा कळस चढवला. विराटने या सामन्यात फलंदाजी करताना १०० धावांची खेळी केली.

पाकिस्तानने केल्या २४१ धावा

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सौद शकीलने ६२ धावांची खेळी केली. तर मोहम्मद रिझवानने ४६ धावांची खेळी केली. तर खुशदील शाहने ३८ धावांची खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानचा डाव अवघ्या २४१ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

Maharashtra Live News Update: मंत्री कोकाटेंच्या राजीनामाची चर्चा नाही - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

SCROLL FOR NEXT