rohit sharma with jos buttler twitter
Sports

IND vs ENG: जिथे सेमिफायनल होणार तिथे कसं आहे वातावरण? सामन्याच्या काही तासांपूर्वीचा VIDEO होतोय व्हायरल

India vs England, Guyana Latest Weather Update: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलचा सामना रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील पहिल्या सेमिफायनलच्या सामन्यात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आणि स्पर्धेतील फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. तर दुसऱ्या सेमिफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्यावर पावसाचं सावट असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सोशल मीडियावर गयानातील वातावरणाचा लेटेस्ट व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा सामना हा गयानामध्ये होणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरु होईल. तर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार,सामन्यावेळी पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून क्रिकेट फॅन्सला दिलासा मिळाला असेल. व्हायरल होत असलेला व्हिडिओ विमल कुमार या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात आभाळ मोकळं असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी असंही लिहिलं आहे की, गेल्या २४ तासांपासून गयानामध्ये पाऊस पडलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना हा सामना पावसाच्या आगमनाशिवाय पाहायला मिळू शकतो. असा अंदाज वर्तवला गेला आहे.

काय आहे हवामानाचा अंदाज?

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, या सामन्यावेळी पावसाची शक्यता ६० टक्के इतकी असणार आहे. सामना सुरु झाल्यानंतर पावसाची शक्यता ही ३३ टक्के इतकी असणार आहे. तर दुपारी १ च्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता ५१ टक्के इतकी असेल. पावसाने अडथळा निर्माण केल्यास षटकं कमी केली जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT