क्रीडा

Ind Vs Eng Update : ११ दिवसांत ६ सामने खेळणार टीम इंडिया; 'हिटमॅन' येतोय, पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी २० आणि वनडे मालिका होत असून, संपूर्ण वेळापत्रक पाहा!

Nandkumar Joshi

मुंबई: भारतीय संघानं इंग्लंड दौऱ्यावर असून, सुरुवात चांगली होऊनही कसोटी सामन्यात विजय मिळवू शकला नाही. एजबेस्टन कसोटीत विजयाच्या समीप जाऊनही पराभव पत्करावा लागला. रूट आणि बेयरस्टो या जोडीनं तुफान फलंदाजी केल्यानं भारताचा ७ विकेटने पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहते निराश झाले.

आता भारतीय संघाकडे या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी- २० मालिका आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेची सुरुवात ७ जुलैपासून टी-२० सामन्याने होणार आहे. (India Vs England T 20 and One Day Series)

भारताचा सलामीवीर आणि हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करणार आहे. रोहित जवळपास ११२ दिवसांनंतर टीम इंडियासाठी (Team India) खेळणार आहे. त्याने शेवटचा सामना १४ मार्च रोजी खेळला होता.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत ६ सामने होतील. हे सामने ७ जुलैपासून ते १७ जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहेत. म्हणजेच दोन्ही संघ पुढील ११ दिवसांत सहा सामने खेळतील. पहिला टी-२० सामना साउथम्टनमध्ये होईल. दिवस-रात्र हा सामना असणार आहे. जो रात्री साडेदहा वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल.

टी-२० मालिकेतील दुसरा सामना ९ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये संध्याकाळी सात वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल. तिसरा टी-२० सामना १० जुलै रोजी नॉटिंघममध्ये खेळवण्यात येईल. हा सामना संध्याकाळी ७ वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल.

यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका होईल. वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे १२, १४ आणि १७ जुलै रोजी होतील. सुरुवातीचे दोन सामने हे दिवस-रात्र खेळवण्यात येतील. ते भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होतील. तिसरा सामना हा भारतीय वेळेनुसार, दुपारी साडेतीन वाजता खेळवण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT