Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीत भारताचा पराभव, बेयरस्टो-रूटने स्वप्नांवर फेरले पाणी

बर्मिंगहॅम येथील एजबेस्टन मैदानात खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडकडून ७ विकेटने मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.
Eng and india match
Eng and india match saam tv
Published On

बर्मिंगहॅम: बर्मिंगहॅम येथील एजबेस्टन मैदानात खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडकडून ७ विकेटने मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने चौथ्या डावात ३७८ धावांचा यशस्वी पाठलाग करून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. (India and England test Cricket Match update )

Eng and india match
NZC : ऐतिहासिक निर्णय! महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना मिळणार समान मानधन

१५ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये (England) कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न घेऊन टीम इंडिया एजबेस्टनमध्ये पोहोचली होती. मात्र, या स्वप्नांवर इंग्लंडच्या बेयरस्टो आणि रूट या दोघांनी पाणी फेरले.

चौथ्या डावात ३७८ धावांचे बलाढ्य लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या (England) जो रूट आणि जॉनी बेयरस्टो यांनी तुफानी खेळी केली. दोघांनीही शतक ठोकले. टीम इंडियाला (India) चौथ्या दिवशी जिंकण्यासाठी सात विकेटची आवश्यकता होती. मात्र, दोघांनीही टीम इंडियाच्या गोलंदाजाला एकही यश पदरात पडू दिलं नाही. जो रूटने १४२ धावा आणि बेयरस्टो याने ११४ धावा केल्या.

Eng and india match
आपल्या पहिल्या प्रेमाचा सानिया मिर्झाने केला उलगडा (व्हिडिओ पाहा)

बेयरस्टो आणि रूट या दोघांच्या तडाखेबंद खेळीमुळे इंग्लंडने अवघ्या ७७ षटकांत ३७८ धावांचं आव्हान यशस्वीपणे पूर्ण केलं. टीम इंडियाने प्रतिस्पर्धी संघाला साडेतीनशेच्या वर धावांचं आव्हान दिलं आणि त्यानंतर सामना गमावावा लागला असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. मात्र, बेयरस्टो आणि जो रूटच्या बहारदार खेळीनं हे शक्य करून दाखवलं.

भारताचा पहिला डाव - ४१६ धावा, रिषभ पंत - १४६, रवींद्र जडेजा १०४ धावा

इंग्लंडचा पहिला डाव - २८४ धावा, जॉनी बेयरस्टो १०६ धावा

भारताचा दुसरा डाव - २४५ धावा, पुजारा - ६६, रिषभ पंत - ५७

इंग्लंडचा दुसरा डाव ३७८/३, जो रूट - १४२ धावा, जॉनी बेयरस्टो - ११४ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com