VIDEO : 'पाच वर्ष झोपले होते का?', सिंचन घोटाळ्यावरून जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळा प्रकरण चौकशीचं खापर आर. आर. पाटील यांच्यावर फोडलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली देत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मागचे ५ वर्ष हे झोपले होते का? तेव्हा तुमचं तोंड का बंद होतं ? असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
तासगाव येथील सभेत आज अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन केसाने गळा कापला असा धक्कादायक खुलासा केला आहे. सिंचन घोटाळा प्रकरणातील फाइलवर आर. आर. पाटील यांची सही होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री झाल्यावर दाखवलं, असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे. त्यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मागचे ५ वर्ष हे झोपले होते का? तेव्हा तुमचं तोंड का बंद होतं ? त्यांचं सध्या फडणवीस यांच्यावर प्रेम वाढलं आहे, जवळीक वाढली आहे. मेल्यानंतर त्या माणसाबद्दल वाईट बोलणं चुकीचं आहे, असं आव्हाड यांनी केलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.