Maharashtra News Live Updates : मनमाड-नांदगाव मार्गावर भीषण अपघात; दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, तीन जणांचा मृत्यू

Maharashtra Marathi News Live Updates : आज मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, उमेदवारी अर्ज, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Nashik Accident : मनमाड-नांदगाव मार्गावर भीषण अपघात; दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, तीन जणांचा मृत्यू

मनमाड-नांदगावं मार्गांवर पानेवाडीजवळ भीषण अपघात झाला आहे. दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 2 लहान मुलासह तीन जण ठार झाले आहेत. तर दोन महिला आणि एक लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले दाखल. मयत झालेले जळगाव जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

पंढरपूरचे काँग्रेसचे उमेदवार भागीरथ भालके खासदार प्रणिती शिंदेंच्या भेटीला

सोलापुरातील प्रणिती शिंदे यांच्या जणवत्सल्य निवासस्थानी भेटीला आले आहेत. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याला उमेदवारी दिल्याने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये तणाव वाढलाय. प्रणिती शिंदेच्या भेटीच्या कारणावरून माध्यमाशी भागीरथ भालके यांनी नकार दिला.

भांडुपमधील बुक डेपोला आग

भांडुप पश्चिम शिवाजी तलाव पराग विद्यालय बाजूला असलेल्या बुक डेपोला आग लागलीय. अग्निशमन दलाला आग शमवण्यात यश आले आहे. घटनास्थळी तीन अग्निशामक दलाच्या गाड्या आणि एक ॲम्बुलन्स दाखल झालीय. आजूबाजूच्या शाळांना दिवाळीची सुट्टी असल्या कारणामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, होणार जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

८ किंवा ९ नोव्हेंबर रोजी मोदी पुणे दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात जाहीर सभा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा पुणे दौरा

पुण्यातील महायुतीच्या सर्व ८ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार एकत्रित सभा

भाजपकडून शहरात अनेक केंद्रीय नेत्यांच्या सभेचं आयोजन

विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उतरणार का? १ नोव्हेंबरला जरांगे-पाटील घेणार निर्णय

राज्यातील विधानसभा निवडणुकीत मराठा समाज उतरणार का याबाबतचा मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय आता १ नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात इच्छुक मराठा आणि इतर समाजातील उमेदवारांसाठी जातीय समीकरण जुळणार की नाही याबाबतची बैठक होणार आहे. या बैठकीला मुस्लिम, दलीत, आदिवासी ओबीसी घटकातील प्रमुख, धर्मगुरू यांची बैठक अंतरवाली सराटीमध्ये होणार आहे. त्या बैठकीत समीकरण जुळते की नाही यानंतर १ नोव्हेंबर किंवा २ नोव्हेंबर रोजी मराठा समाज विधानसभा निवडणुकीमध्ये किती ठिकाणी उमेदवार उभे करणार आणि किती कोण उमेदवार असणार आणि जर समीकरण जुळले नाही तर निवडणूक लढवली जाणार नाही याची घोषणा केली जाईल.

महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसचे लहू शेवाळेंनी भरला उमेदवारी अर्ज

छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे लहू शेवाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत जालन्याचे खासदार कल्याण काळे होते. लहू शेवाळे यांना एमके देशमुख यांच्याऐवजी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. आता छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप, काँग्रेस, एमआयएम आणि इतर पक्षांच्या उमेदवारांची लढत होणार आहे.

Assembly Election: राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकरांनी भरला उमेदवारी अर्ज

पुण्याच्या भोर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी उमेदवारी अर्ज भरलाय. रात्री उशिरा राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर आज त्यांनी अर्ज भरलाय. सभेत विजयी होण्याचा मांडेकर यांनी निर्धार केलाय. मांडेकरसह मराठा समाज, कुलदीप कोंडे,रणजीत शिवतरे व अपक्षांकडून उमेदवारी अर्ज भरलेत.

उल्हासनगर मतदार संघात महायुतीत बंडखोरी, भारत गंगोत्रींनी भरला अर्ज

वार गटाचे उल्हासनगर शहराध्यक्ष भरत गंगोत्री आज महायुतील भाजपा चे उमेदवार कुमार आयलानी यांच्या विरोधात फॉर्म आज भरला, उल्हासनगर येथील गोल मैदान पासून प्रांत कार्यालयापर्यंत जोरदार शक्ती प्रदर्शन करत गंगोत्री यांनी आपला अर्ज भरला,भारत गंगोत्री उल्हासनगर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातुन मुख्य दावेदार होते.

मात्र भाजप चे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना भाजपाने दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर केल्याने गंगोत्री नाराज होते, आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला, आम्हाला उल्हासनगरचा विकास करायचा आहे, विकास न झाल्याने विद्यमान आमदारांचा सर्वे निगेटिव्ह केला होता, चेहरा बदलो उल्हासनगर बदलो याप्रमाणे मी शहराच्या विकासासाठी निवडणुकीचा अर्ज भरला आहे असं मत भरत गंगोत्री यांनी व्यक्त केला.

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी भरला उमेदवारी अर्ज

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी भाजप व महायुतीच्या वतीने आज दौंड तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर, योगेश अण्णा टिळेकर, प्रदेश उपाध्यक्षा सौ. कांचन कुल पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आदी उपस्थित होते.

Assembly Election: शिवसेनेकडून राजेश खंदारे यांनी भरला उमेदवारी अर्ज

 राजेश खंदारे यांनी  धारावी मतदार संघामधून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचे शक्ती प्रदर्शन, भरला उमेदवारी अर्ज

जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर आज खोतकर आणि मोठे शक्ती प्रदर्शन करत आपले पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांसह भव्य रॅली काढली शहरातील मामा चौकातून भाग्यनगर पर्यंत असंख्य कार्यकर्त्यांसह अर्जुन खोतकर यांनी हे शक्ती प्रदर्शन केलं, यावेळी पुन्हा एकदा लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार असल्याचं सांगत त्यांनी आपल्या विजयाची खात्री दिली.

देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी

- नाशिकचा देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी

- महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेने अचानक दिला उमेदवार

- शिंदेंच्या शिवसेनेकडून राजश्री आहिराव करत आहे उमेदवारी

- शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या खेळीने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची कोंडी

- नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सरोज अहिरे आहेत उमेदवार

- नंतर दिंडोरीमध्ये धनराज महाले यांना देखील शिवसेनेचा एबी फॉर्म

कसब्यातून मनसेचे उमेदवार गणेश भोकरे मैदानात; आज भरला उमेदवारी अर्ज

कसब्यातून मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला आहे.

शर्मिला ठाकरेंसह गणेश भोकरे गणेश कला क्रीडा मंच येथे भरला उमेदवारी अर्ज

अमित ठाकरे विजय होतील विश्वास मला महायुती आणि महाआघाडी माहिती नाही.

अनेक ठिकाणी उमेदवार विजयी होतील

अजूनही आमचे उमेदवार जाहीर करण्याचं काम सुरू

नवाब मलिक यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॅार्म जोडला आहे

Dhule News: शिंदखेडा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या वतीने संदीप बेडसे यांना उमेदवारी

शिंदखेडा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने संदीप बेडसे यांना उमेदवारी

उमेदवारी दाखल करताना बेडसें कडून मोठ शक्ती प्रदर्शन...

शेवटच्या दिवसापर्यंत विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर नसल्याने होता संभ्रम..

काल सायंकाळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संदीप बेडसेंच शक्ती प्रदर्शन..

हजारो महिला पुरुष कार्यकर्ते रॅलीत सहभागी..

Nandurbar News: शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आमश्या पाडवी भरला उमेदवारी अर्ज

शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आमश्या पाडवी भरला उमेदवारी अर्ज

अक्कलकुवा अक्राणी मतदार संघासाठी दाखल केला अर्ज.....

अक्कलकुवा शहरात आमश्या पाडवी यांचं भव्य शक्तिप्रदर्शन....

आमश्या पाडवी यांचा विरोधात महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील भरला उमेदवारी अर्ज....

Pune News: कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल

तर मनसे कडून गणेश भोकरे यांनी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत केला उमेदवारी अर्ज दाखल

Dhule News:  अनिल गोटे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल गोटे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

खंडेराव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अनिल गोटे यांनी रॅली काढत उमेदवारी अर्ज केला दाखल

यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक होते उपस्थित

शिवसैनिकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आले करण्यात

या निवडणूकीत साम, दंड, भेद विजयासाठी वापरणार

दाम मी निवडणूकीत कधीच वापरत नसल्याचं म्हणत प्रतिस्पर्धी उमेदवारांवर नाव न घेता साधला निशाणा..

Nashik News: नाशिक पश्चिमचे ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचं शक्ती प्रदर्शन

- नाशिक पश्चिमचे ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचं शक्ती प्रदर्शन

- आज उमेदवारी अर्ज भरण्याआधी बडगुजर यांचं मतदारसंघात शक्ती प्रदर्शन

- माझ्यावर गुंडगिरी आणि दहशतीचे आरोप करणाऱ्यांकडे पिस्तुलाचं लायसन्स, ( सीमा हिरे यांच्यावर टीका )

- माझ्याकडे पिस्तूल आणि लायसन्स देखील नाही, मी कुणाला साधी चापट देखील मारलेली नाही

- खोटे आरोप करून मला अडकवण्याचा प्रयत्न

Maharashtra Marathi News Live Updates : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार मयुरेश वांजळे करणार शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत आर्ज दाखल

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी

सिंदखेड राजा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदार संघात महायुतीत बंडखोरी पाहायला मिळत आहे .. सिंदखेड राजा येथील भाजपा चे युवा नेते अंकुर देशपांडे यांनी आपला आपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे या मतदार संघात आता महायुतीत बंडखोरी झाली असल्याचे समोर आले. सिंदखेड राजा मतदार संघातील विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघात महायुतीत उमेदवारीसाठी मोठा पेच निर्माण झालेला होता.

कराडमध्ये ठाकरे गटाला धक्का

उबाठाचे जिल्हा समन्वयक इंद्रजीत गुजर यांचा स्वाभिमानीत प्रवेश

तिसऱ्या आघाडीतून लढणार कराड दक्षिण मतदार संघात निवडणूक

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात

माढा मतदारसंघात महायुतीला उमेदवार मिळाला

माढा मतदारसंघात अखेर महायुतीला उमेदवार मिळाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांना उमेदवारी मिळाली आहे. माढा मतदारसंघात अजित पवार यांना उमेदवार मिळत नव्हता. अशी चर्चा होती. मात्र सरते शेवटी अजित पवार यांनी माढा तालुक्यातील जुंना मातब्बर गट असणाऱ्या माजी आमदार धनाजी साठे यांच्या स्नुषा मिनल साठे यांना उमेदवारी देऊ केली आहे. आमदार यशवंत माने यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा ए बी फॉर्म मीनल साठे यांना दिला. यानंतर आज साठे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. यानंतर माढा मतदारसंघात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मीनल साठे आणि अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

Maharashtra Marathi News Live Updates :  मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदार संघातून शिंदेच्या शिवसेनेकडून सुरेश (बुलेट) पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

Maharashtra News Live Updates : भाजपची चौथी यादी जाहीर

भाजपकडून आणखी दोन उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. उमरेड आणि मिरा भाईंदरमधून भाजपने दोन उमेदवारांची घोषणा केली.

राजेश लाटकर भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

काँग्रेस पक्षाने जरी उमेदवार बदलला असला तरीही मी निवडणूक लढवणार राजेश लाटकर आपल्या उमेदवारीवर ठाम

काँग्रेस मधील काही ठराविक नेत्यांनी माझी जाणीवपूर्वक बदनामी केली राजेश लाटकर यांचा आरोप

राजेश लाटकर यांच्या समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

आमदार झीशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना धमकी देणाऱ्याला अटक

आमदार झीशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना धमकी देणाऱ्याला अटक

गुरफान खान नावाच्या 20 वर्षाच्या तरुणाला नोएडा मधून अटक

शुक्रवारी आमदार झिशान सिद्धीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर आला होता धमकीचा फोन

फोनवर झिशान सिद्धीकी आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन खंडणीची करण्यात आली होती मागणी

निर्मल नगर पोलिस ठाण्यात करण्यात आला होता गुन्हा दाखल

26 तारखेनंतर एकनाथ शिंदे यांना देखील रडू कोसळणार -संजय राऊत

3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश

दहशतवाद्याविरोधात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश

3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश

अखनूर परिसरात सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

 बोरिवली मध्ये माजी खासदार गोपाळ शेट्टी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

बाहेरील उमेदवार संजय उपाध्य यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

जर पक्षाने उमेदवारी बदलला तर विचार केला जाईल

जर उमेदवारी बदलले नाही तर एकदा अपक्ष अर्ज भरलेला माघार घेणार नाही

मातोश्रीच्या अंगणात राज ठाकरे यांची खेळी...

भाजपच्या तृप्ती सावंत मनसेमध्ये पक्ष प्रवेश करणार

तृप्ती सावंत शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी

तृप्ती सावंत यांनी 2019 ची निवडणूक अपक्ष लढल्याने शिवसेनेला फटका बसला होता त्यामुळे शिवसेनेचे वांद्रे पूर्वचे उमेदवार दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव होऊन झिशान सिद्धिकी आमदार झाले होते.

शिवसेना ठाकरे गटाचा 2019 मध्ये हा पराभव मातोश्रीच्या अंगणातला असल्याने फार जिव्हारी लागला होता. त्यानंतर तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता

मुरबाड मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी

मुरबाड मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनरे आज महाविकास आघाडीच्या उमेदवारा विरोधात फॉर्म भरणार आहेत शैलेश वडनरे मुरबाड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातुन मुख्य दावेदार होते.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शिवसेना शिंदे गटातून आलेले सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर केल्याने वडनरे नाराज आहेत.आज ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Maharashtra Marathi News Live Updates : संजना जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमध्ये संजना जाधव या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यासाठी शक्ती प्रदर्शन करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा एक दिवस असतानाच शिवसेनेकडून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली. कन्नडसोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्य आणि पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आणि एमआयएम उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यासाठी संभाजीनगर मध्यचे शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल हे रॅली काढत आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एमआयएमचे इम्तियाज जलील हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यांनी रॅली काढण्यासंदर्भात अद्याप सांगितले नाही.

Maharashtra News Live Updates : श्रीनिवास वनगा १२ तासांपासून बेपत्ता

विधानसभेच तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा मागील बारा तासांपासून नोटरीचेबल आहेत . काल संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा आपले दोन्ही मोबाईल बंद करून घरातून निघून गेलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com