Indian cricket team SAAM TV
Sports

IND VS ENG: दोन जागा, पाच दावेदार, सेमीफायनल मध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होणार?

टीम इंडिया मध्ये काय बदल केले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली: टी20 वर्ल्डकप मध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करून फायनल मध्ये प्रवेश केला आहे. उद्या गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनलचा सामना अॅडलेडच्या मैदानात रंगणार आहे. दुसरीकडे भारत-पाकिस्तान 2007 च्या वर्ल्डकपप्रमाणे पुन्हा एकदा फायनलसाठी मैदानात आमने-सामने येणार का? अशी चर्चा क्रिडा विश्वात रंगू लागल्या आहेत.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात महत्वपूर्ण लढत होणार असून भारताला फायनल मध्यो पोहोचण्यासाठी हा शेवटचा टप्पा पार करावा लागणार आहे. यासाठी टीम इंडिया मध्ये काय बदल केले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (Indian cricket team playing eleven might change ahead of semifinal match)

13 नोव्हेंबरला मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंड मध्ये टी20 वर्ल्डकप 2022 ची फायनल होणार आहे.या फायनल मध्ये 2007 च्या वर्ल्डकपची पुनरावृत्ती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी भारताला फायनल मध्ये पोहोचण्याची गरज आहे.

सेमीफायनल मध्ये पंतची एन्ट्री?

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्डकप मध्ये टीम इंडियानं आतापर्यंत खूपच चांगलं प्रदर्शन केलं आहे. सुपर 12 राऊंडच्या पाच सामन्यांपैकी चार सामने भारतानं जिंकले आहेत. यामध्ये तीन सामन्यात टीम इंडियाने एकसारखीच प्लेईंग 11 ठेवली. फक्त दोन सामन्यामध्ये बदल करण्यात आले. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियात बदल केले जाण्याची शक्यता आहे. दिनेश कार्तिक किंवा रिषभ पंत? अक्षर पटेल किंवा दीपक हुड्डा/युजवेंद्र चहल?

इंग्लंडकडे आदिल रशिद सारखा अप्रितम फिरकीपटू आहे. अशा गोलंदाजावर आक्रमकपणे फलंदाजी करण्यासाठी डावखुरा फलंदाजाची गरज असते. अशा परिस्थितीत रिषभ पंतचा पर्याय उत्तम ठरू शकतो. जर टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचे फलंदाज रशीदच्या गोलंदाजीवर खेळले आणि पंतची फलंदाजी नाही आली,तर ते कार्तिक सारखी मॅच फिनिशर होऊ शकतात का? हा प्रश्न आहे.

अक्षर,चहल किंवा हुड्डा?

अक्षर पटेल वर्ल्डकप मध्ये फारसा चमकला नाही. अक्षरकडून भेदक गोलंदाजी होत नसल्याने युजवेंद्र चहलला संघात सामील करण्याची मागणी होत आहे.इंग्लंडच्या प्लेईंग 11 मधील डावखुऱ्या फलंदाजांच्या कामगिरीकडे पाहता दोन्ही विकल्प जास्त प्रभावी नाहीत. अशा परिस्थितीत दिपक हुड्डा एक चांगला विकल्प ठरू शकतो. परंतु, हुड्डालाही एका सामन्यात संधी दिली होती आणि तो स्वस्तात माघारी परतला होता. त्यामुळे अक्षर पटेललाच आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.

इंग्लंड मध्ये दोन बदल

इंग्लंडच्या दोन खेळाडूंना दुखापत झाली आहे. फलंदाज डेविड मलान आणि वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या फिटनेकडे पाहता इंग्लंड शेवटच्या क्षणापर्यंत थांबण्यास तयार आहे. अशा परिस्थितीतही जर दोघेही नाही खेळले, तर बदल होणं पक्क आहे. मलानच्या जागेवर फिल सॉल्ट तिसऱ्या नंबर वर येऊ शकतो आणि मार्क वूडच्या जागेवर क्रिस जॉर्डनची जागा पक्की आहे.

India vs Eng:संभाव्य प्लेईंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.

इंग्लंड: जॉस बटलर (कर्णधार-विकेटकीपर), अॅलेक्स हेल्स,डेविड मलान/फिल सॉल्ट, बेन स्टोक्स,हैरी ब्रूक,मोईन अली,लियम लिविंगस्टन,सॅम करन,क्रिस वोक्स,क्रिस जॉर्डन/मार्क वुड और आदिल रशीद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT