india vs england 5th test team india record at dharamshala ground cricket news marathi  yandex
Sports

IND vs ENG 5th Test: धरमशालेत रंगणार भारत- इंग्लंड अंतिम कसोटी सामना! इथे कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Team India Record At Dharamshala: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशालाच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या मैदानावर कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड?

Ankush Dhavre

India vs England 5th Test, Dharamshala Record:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना ७ मार्चपासून सुरू होणार आहे. रांचीमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह कसोटी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेत रंगणार आहे. दरम्यान या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या.

कसा राहिला आहे रेकॉर्ड?

भारतीय संघाने धर्मशाळेच्या मैदानावर केवळ १ कसोटी सामना खेळला आहे. २०१७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने ३०० धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात १३७ धावा केल्या. दरम्यान भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात फलंदाजी करताना ३३२ तर दुसऱ्या डावात १०६ धावा करत सामना जिंकला. भारतीय संघाने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला होता. (Cricket news marathi)

या खेळाडूंनी केली होती शानदार कामगिरी..

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा आणि केएल राहुलने अर्धशतकं झळकावली होती. जडेजा यावेळीही जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने या मालिकेत शतकही झळकावलं आहे. तर केएल राहुलने ६० धावांची खेळी केली होती. रविंद्र जडेजाने ६३ आणि चेतेश्वर पुजाराने ५७ धावांचे योगदान दिले होते.

भारताने जिंकली मालिका..

या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी दमदार कमबॅक केलं. भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना १०७ धावांनी, तिसरा कसोटी सामना ४३४ धावांनी आणि चौथा कसोटी सामना ५ गडी राखून जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्याने भाव दुप्पट

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai - Virar MSRTC : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

Ladki Bahin Yojana: लाडकींमुळे आमदारांचा निधी रखडला? ९ महिन्यांपासून १ रुपयाही मिळाला नाही; मंत्रालयात हेलपाटे

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ; १७०० कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT