england cricket team  twitter
क्रीडा

IND vs ENG 5th Test: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! अंतिम कसोटीसाठी इंग्लंडच्या ताफ्यात अश्विनसारख्याच घातक गोलंदाजाची एन्ट्री

India vs England 5th Test: इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत इंग्लंडचा संघ १-३ ने पिछाडीवर आहे.

Ankush Dhavre

Michael Vaughan On Shoaib Bashir:

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत इंग्लंडचा संघ १-३ ने पिछाडीवर आहे. भारतातील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीसाठी पोषक असल्याने दोन्ही संघातील खेळाडूंनी आपले सर्वोत्तम फिरकीपटू मैदानात उतरवले आहेत.

इंग्लंडकडून शोएब बशीरला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जात आहे. इंग्लडच्या माजी खेळाडूचं म्हणणं आहे की, युवा गोलंदाज शोएब बशीर हा भविष्यात आर अश्विनसारखा यशस्वी गोलंदाज बनू शकतो.

भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील दिग्गद गोलंदाजांपैकी एक आहे. मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. असा कारनामा करणारा तो दुसराच भारतीय गोलंदाज ठरला होता.

धरमशालेत होणारा सामना हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकल वॉन आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की,' आम्हाला आणखी एक जागतिक दर्जाचा स्टार खेळाडू मिळाला आहे. त्याचं नाव आहे शोएब बशीर. दुसऱ्या कसोटीत त्याने ८ गडी बाद केले. तो नवीन आर अश्विन आहे, जो आम्ही शोधून काढला आहे.' (Cricket news in marathi)

भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. मात्र मायकल वॉनला खात्री आहे की, इंग्लंडचा संघ धरमशाला कसोटीत दमदार कमबॅक करेल. मायकल वॉनचं म्हणणं आहे की, धरमशालेतील वातावरण थंड असेल आणि हे इंग्लिश खेळाडूंसाठी पोषक असेल. त्यामुळे इंग्लंडचा संघ जिंकू शकतो.

भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत आर अश्विनची दमदार कामगिरी..

भारताचा स्टार आर अश्विनने या मालिकेतील चारही सामन्यांमध्ये अप्रितम गोलंदाजी केली आहे. त्याने ४ सामन्यांमध्ये १७ गडी बाद केले आहेत. तर इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीरने १२ गडी बाद केले आहेत. आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९९ कसोटी सामन्यांमध्ये ५०७ गडी बाद केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT